वृद्धाने रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे मुजविले .
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:19 IST2021-02-05T09:19:56+5:302021-02-05T09:19:56+5:30
बामणोली: सध्या अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडलेले असतात; परंतु सर्वांनाच शासकीय कामांची अपेक्षा असते. त्या विभागाला शिव्या देण्याशिवाय ...

वृद्धाने रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे मुजविले .
बामणोली: सध्या अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठे-मोठे खड्डे पडलेले असतात; परंतु सर्वांनाच शासकीय कामांची अपेक्षा असते. त्या विभागाला शिव्या देण्याशिवाय कोणीही स्वत: मात्र काहीही योगदान देत नाही. परंतु याला मात्र अपवाद ठरले आहेत. उंबरी चोरगे येथील ७२ वर्षीय वृद्ध भिकू सूतार. अंधारी ते उंबरी वाडी या कच्च्या असणाऱ्या रस्त्यावर मोठे खड्डे पडले होते. येथून प्रवास करणाऱ्या उंबरीवाडी, उंबरी चोरगे, कारगाव, अंबावडे या चार गावांच्या लोकांना आपली वाहने चालविणे अवघड बनले होते. शासनस्तरावरून मदतीची अपेक्षा न ठेवता भिकू सुतार यांनी मात्र दिवसभर टिकाव खोरे घेऊन स्वत: एकट्याने मुरूम माती टाकून हे खड्डे मुजवून तरुणवर्गासमोर एक आदर्श उदाहरण ठेवले आहे. त्यांच्या या समाजोपयोगी कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
फोटो: 03गोरे