अहो आश्चर्यम ! बंद बोअरवेलमधून चालू आहे पाणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 15:04 IST2017-09-28T14:58:37+5:302017-09-28T15:04:17+5:30
कायम स्वरूपी दुष्काळात होरपळणाºया खटाव तालुक्यातील गोपूज गावातील प्रगतशील शेतकरी पृथ्वीराज घार्गे यांनी जानेवारी २०१७ मध्ये गावच्या पश्चिमेस असणाºया आपल्या शेतात बोअर घेतली. त्यावेळी केवळ दिवसातून १० मिनिट चालणारी बोअर आता चक्क चालू न करता त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येत आहे.

अहो आश्चर्यम ! बंद बोअरवेलमधून चालू आहे पाणी!
औंध: कायम स्वरूपी दुष्काळात होरपळणाºया खटाव तालुक्यातील गोपूज गावातील प्रगतशील शेतकरी पृथ्वीराज घार्गे यांनी जानेवारी २०१७ मध्ये गावच्या पश्चिमेस असणाºया आपल्या शेतात बोअर घेतली. त्यावेळी केवळ दिवसातून १० मिनिट चालणारी बोअर आता चक्क चालू न करता त्यातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येत आहे. त्यामुळे सर्वांनाच आश्चर्य वाटत असून हे पाणी पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली आहे.
४ जानेवारी २०१७ रोजी पृथ्वीराज घार्गे यांनी आपल्या शेतात बागायत करण्याच्या हेतूने बोअरवेल घेतली. पण त्यांच्या पदरी निराशा पडली. कारण ती बोअरवेल जेमतेम १० मिनिटेच चालत असे, एवढ्याशा पाण्यावर शेती कशी करायची, या विचाराने त्यांनी याकडे दुर्लक्ष केले.
बुधवार, दि.२७ रोजी घार्गे आपल्या शेतात गेले असता त्यांना बंद बोअरवेल मधून पाणी येत असल्याचे दिसून आले. पण त्यांचा विश्वास बसला नाही. पावसाचे साठलेले पाणी झिरपून पडत असावे, असे त्यांना वाटले. त्यानंतर त्यांनी बोअर अर्धा तास चालू करून बंद केली. मात्र, काही वेळाने पुन्हा त्यातून पाणी सुरू झाले. हे पाणी एक ते दीड इंचीच्या आकाराचे चालू राहिले.
त्यांनतर त्यांनी आपल्या मित्र मंडळी,ग्रामस्थांना हा प्रकार सांगितला त्याठिकाणी सर्वांनी जाऊन पाहिले तेव्हा सर्वजण आवाक झाले. विशेष म्हणजे त्यांच्या आसपास तीन -चार बोअरवेल इतर शेतकºयांच्या आहेत. मात्र घार्गेंच्याच बोअरमधून पाणी येत असल्याने औत्सुक्याचा विषय ठरला आहे.
कोण म्हणतय जास्त पावसाने बोअर उफाळून आली आहे तर कोण म्हणतय ओव्हरफ्लो! काहीही असो आपल्या बोअरवेल ला पाणी भरपूर आले आहे व ते अजून चालूच आहे. या गोष्टीने पृथ्वीराज घार्गे यांच्यासह कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झालाय.