कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करणार नाही : कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST2021-09-02T05:25:06+5:302021-09-02T05:25:06+5:30
लोणंद : वाई विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देणार असून काँग्रेस कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची गय केली ...

कार्यकर्त्यांना त्रास देणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करणार नाही : कदम
लोणंद : वाई विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कार्यकर्त्यांना बळ देणार असून काँग्रेस कार्यकर्त्यांना विनाकारण त्रास देणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची गय केली जाणार नाही,’ असा इशारा राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिला.
लोणंद येथील शासकीय विश्रामगृहात मंगळवारी काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या विविध अडचणी समाजावून घेण्यासाठी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत ॲड. बाळासाहेब बागवान यांच्या घरी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.
कदम म्हणाले, ‘आगामी होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांमध्ये राहून काम केले पाहिजे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी केलेल्या आर्थिक मदतीची माहीती त्यांनी यावेळी दिली.’
यावेळी काँग्रेसचे खंडाळा तालुकाध्यक्ष प्रा. एस. वाय. पवार, सर्फराज बागवान, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विराज शिंदे, माजी विरोधी पक्ष नेते राजेंद्र डोईफोडे, माजी नगरसेविका शैलजा खरात, हेमलता कर्नवर, स्वाती भंडलकर, हृषिकेश धायगुडे, सुभाष कोळेकर, संभाजी साळुंखे, जयदीप शिंदे, ॲड. हेमंत खरात, दत्ता खरात, रमेश कर्नवर, ॲड. विलायत मणेर, तारिक बागवान, शरद भंडलकर, मस्कू शेळके, प्रणव डोईफोडे व खंडाळा तालुक्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
310821\20210831_113035.jpg
वाई विधानसभा मतदार संघातील कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना बळ देणार.... राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम