शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Satara: शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश; माणमधील शेतीपंपासाठी सलग आठ तास वीज, अधिकाऱ्यांचे आश्वासन 

By नितीन काळेल | Updated: March 12, 2025 19:34 IST

सातारा : महावितरणच्या चुकीच्या कारभाराविरोधात माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी साताऱ्यात अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरच उपोषणाला सुरुवात केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने ...

सातारा : महावितरणच्या चुकीच्या कारभाराविरोधात माण तालुक्यातील शेतकऱ्यांनी साताऱ्यात अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरच उपोषणाला सुरुवात केली. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने शेतीपंपांना सलग आठ तास वीजपुरवठा, शेनवडी उपकेंद्रात दुप्पट क्षमतेचा ट्रान्सफाॅर्मर उभारु अशी लेखी आश्वासने दिले. त्यानंतरच माणमधील शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले.माण तालुक्यात महावितरणच्या कारभाराबद्दल जनतेत रोष आहे. तसेच शेतकऱ्यांनाही या कंपनीचा फटका बसत आहे. यासाठी माणमधील शेतकरी साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी कृष्णानगर येथील महावितरण अधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोरच उपोषणाला सुरूवात केली. त्यामुळे महावितरणचे प्रशासन खडबडून जागे झाले. त्यांनी आंदोलक शेतकऱ्यांसोबत तातडीने चर्चा केली. तसेच काही मागण्या लेखी स्वरुपात मान्य केल्या. त्यामुळे शेतकऱ्यांनी आमरण उपोषण स्थगित केले.

शेतीपंपांना नवीन वीज जोडणी देण्याबाबतची मागणी वरिष्ठ कार्यालयास सादर करू, शेनवडी उपकेंद्राच्या अखत्यारित शेतीपंपांना योग्य दाबाने वीजपुरवठा करण्यात येईल, दीड माहिन्यात शेनवडी उपकेंद्रात असणारा पॉवर ट्रान्सफॉर्मर बदलून दुप्पट क्षमतेचा करू, शेतीपंपांना सलग आठ तास नियमित वीजपुरवठा होईल याची दक्षता घेऊ, असे लेखी पत्र महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी आंदोलक शेतकऱ्यांना दिले आहे.यावेळी महेश करचे, अतुल झिमल, अण्णा व्हरकाटे, शिवाजी काळेल, समाधान पुकळे, शिवाजी जाधव, विजय झिमल, आबा पिसाळ, मधुकर कोळेकर, भारत काळेल यांच्यासह माण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर यादरम्यान आंदोलनस्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा उपस्थित होता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरFarmerशेतकरीagitationआंदोलनelectricityवीजmahavitaranमहावितरण