शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

महापुरुषांवरील आक्षेपार्ह वक्तव्य खपवून घेणार नाही, शिवेंद्रसिंहराजे यांचा इशारा

By सचिन काकडे | Updated: August 18, 2023 16:23 IST

साताऱ्यातील 'त्या' प्रकरणाचे सत्य शोधून काढा

सातारा : छत्रपती शिवाजी महाराज व आपल्या देशाबाबत अवमानकारक पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. अशा प्रकारामुळे समाजात तेढ निर्माण होत असून, महापुरुषांवरील आक्षेपार्ह वक्तव्य कदापी खपवून घेतले जाणार नाही. साताऱ्यात झालेला प्रकार निंदनीय आहे.  पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत केली.सातारा शहरात दोन दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने शहरात तणाव  निर्माण झाला आहे. संतप्त शिवभक्तांनी गुरुवारी शिवेंद्रसिंहराजे यांच्या एका समर्थकाच्या कार्यालयाची देखील तोडफोड केली होती. या सर्व घडामोडींबाबत शिवेंद्रसिंहराजे यांनी शुक्रवारी दुपारी सुरुची या निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.ते म्हणाले, छत्रपती शिवराय हे राज्यालाच नव्हे तर देशाला, जगाला वंदनीय आहेत. सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या संशयित अल्पवयीन मुलास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. असे असतानाही पुन्हा पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. शहरातील वातावरण दूषित करण्याचे प्रयत्न कोण मुद्दाम करतंय का? याचा शोध घेऊन सायबर विभागाने या प्रकरणाचे सत्य समोर आणावे. दोषी कोणाच्याही जवळचा का असेना, त्याच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. या प्रकरणात सायबर सेल कुठेतरी कमी पडत असल्याची खंत व्यक्त करून शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले, वेळीच हे अकाउंट ब्लॉक केले असते तर पोस्ट व्हायरल झाल्या नसत्या. सायबर सेलने हे प्रकरण थोडेसे गांभीर्याने घ्यायला हवे. शहराला जो त्रास होत आहे त्याबद्दल आधी पोलिसांनी कारवाई करावी. पोलिसांकडून यश आलं नाही तर आम्हाला उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलावे लागेल. साताऱ्यातील हिंदू - मुस्लिम बांधवांनी सलोखा राखावा. पोलिस या प्रकरणातील सत्य लवकरच शोधून काढतील, असे आवाहनही शिवेंद्रसिंहराजे यांनी केले

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेPoliceपोलिसSocial Mediaसोशल मीडिया