बैलगाडी शर्यत संयोजकाविरुद्ध कोरेगाव तालुक्यात गुन्हा

By Admin | Updated: December 14, 2014 23:49 IST2014-12-14T22:56:37+5:302014-12-14T23:49:01+5:30

शेल्टी : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचा ठपका

Offense of ballagadi race coordinator in Koregaon taluka | बैलगाडी शर्यत संयोजकाविरुद्ध कोरेगाव तालुक्यात गुन्हा

बैलगाडी शर्यत संयोजकाविरुद्ध कोरेगाव तालुक्यात गुन्हा

कोरेगाव : सर्वोच्च न्यायालयाच्या बंदी आदेशाचे उल्लंघन करत शेल्टी, ता. कोरेगाव येथे विनापरवाना बैलगाडी शर्यत आयोजित केल्याबद्दल सात संयोजकांविरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस जवान पंकज भुजबळ यांनी फिर्याद दाखल केली आहे.
सर्वोच्च न्यायालाचा बंदी आदेश असतानाही बेकायदा बैलगाडी शर्यती आयोजित करून त्यामध्ये बैलांना निर्दयतेने वागविले जात असल्याची माहिती बातमीदाराने जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. अभिनव देशमुख यांना दिली होती. त्यांनी तातडीने पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांना माहितीची पडताळणी करून गुन्हा नोंद करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार धस यांनी हवालदार शशिकांत भोसले, पोलीस नाईक अभयसिंंह भोसले, प्रशांत जाधव, राहुल गायकवाड व चालक आळंदे यांचे पथक शेल्टीत पाठविले होते.
शेल्टीपासून जवळच शेतात बैलगाडी शर्यत सुरूअसल्याचे पथकाला दिसून आले, त्यांनी शर्यत बंद करत शर्यतीच्या आयोजकांकडे परवानगी पत्राची मागणी केली. शर्यतीसाठी प्रशासकीय परवानगी घेतली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आयोजक अक्षय घोरपडे, अतुल बर्गे, पोपट मदने, विकी भंडलकर (सर्व रा. कोरेगाव), श्रीमंत जगदाळे, विकास जगदाळे (दोघे रा. कुमठे) आणि प्रताप झांजुणे (रा. तडवळे संमत कोरेगाव) यांच्याविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला. पोलीस नाईक दिलीप गार्डी तपास करत आहेत. (प्रतिनिधी)


केंद्रीय मंत्री जावडेकर यांच्या विधानाचा विपर्यास
‘सर्वोच्च न्यायालयाची बैलगाड्यांच्या शर्यतीवर बंदी असली तरी केंद्रातील भाजप सरकार या विषयावर तातडीने मार्ग काढणार आहे. लवकरात लवकर या शर्यतींवरील बंदी उठवली जाईल,’ असे वक्तव्य केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी प्रसिद्धी माध्यमांपुढे केले होते. त्याबाबतीत वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शर्यतींवरील बंदी उठल्याचे समजून बैलगाडीची शर्यत आयोजित केल्याचे दिसून आले.

Web Title: Offense of ballagadi race coordinator in Koregaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.