रस्त्यात चर खोदून वाहतुकीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:12 IST2021-02-05T09:12:42+5:302021-02-05T09:12:42+5:30
पाचगणी गावच्या रस्त्यावर शासकीय हद्दीत जेसीबीच्या साह्याने चर काढून रस्त्यावर मोठमोठे दगड टाकले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत ...

रस्त्यात चर खोदून वाहतुकीस अडथळा
पाचगणी गावच्या रस्त्यावर शासकीय हद्दीत जेसीबीच्या साह्याने चर काढून रस्त्यावर मोठमोठे दगड टाकले आहेत. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. समोरून येणारी वाहने संबंधित ठिकाणाहून पुढे जाऊ शकत नाहीत. या अडथळ्यामुळे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित रस्त्याचा वापर मोरणा विभागातील पाचगणी, नागवणटेक, बाहे, गवळीनगर, दिक्षी, धावडे तसेच पाटबंधारे विभाग, भूकंप मापन केंद्र आणि पवनचक्की कंपन्यांची वाहने करत असतात. या रस्त्यावरून कंपन्यांचे कर्मचारी आणि शाळेतील विद्यार्थीही ये-जा करतात. मात्र, रस्त्यात चर खोदून व दगड टाकून अडथळा करण्यात आला आहे. हा अडथळा दूर करावा, अशी मागणी पाटण पोलीस ठाणे, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तहसीलदारांकडे लेखी तक्रार अर्जाद्वारे करण्यात आली आहे.