सरकारी कामात अडथळा; एकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:39 IST2021-05-10T04:39:09+5:302021-05-10T04:39:09+5:30
फलटण : साखरवाडी (ता. फलटण) ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यास जिमच्या साहित्याची पोहोच पावती दे म्हणून धमकी देत, शिवीगाळ करून सरकारी ...

सरकारी कामात अडथळा; एकावर गुन्हा दाखल
फलटण : साखरवाडी (ता. फलटण) ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यास जिमच्या साहित्याची पोहोच पावती दे म्हणून धमकी देत, शिवीगाळ करून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ग्रामपंचायतीचे माजी सदस्य उत्तमराव महादेव भोसले यांनी त्यांच्या वॉर्डमध्ये जिमच्या साहित्याची मागणी केली होती. ते साहित्य आल्याची माहिती त्यांना देण्यात आली होती. मात्र ते साहित्य आणि पोहोच पावती मला दाखव, असे म्हणून शरद किसन जाधव याने साखरवाडी ग्रामपंचायतीचे कर्मचारी दत्तात्रय बाबासोा. बोडरे यांना सांगितले. त्यांनी नकार देतात शरद जाधव याने साहित्य दाखव नाहीतर तू कसा काम करतोय ते बघतो, असे म्हणत बोडरे यांना शिवीगाळ करीत अंगावर धावून गेले व तू ऑफिसच्या बाहेर ये तुझे पाय तोडतो, असे धमकावून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याने बोडरे यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक उस्मान शेख हे करीत आहेत.