एक लाख मेगावॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट

By Admin | Updated: December 2, 2014 23:19 IST2014-12-02T22:04:22+5:302014-12-02T23:19:53+5:30

एन. पी. सिंग : ‘किसन वीर’मध्ये आॅपरेटर्स ट्रेनिंग प्रोग्रॅम

Objective of one lakh MW power generation | एक लाख मेगावॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट

एक लाख मेगावॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ट

भुर्इंज : वीज टंचाई ही राष्ट्रीय समस्या असून देशात वीजेची मागणी आणि पुरवठा यात मोठी तफावत आहे. ही तफावत भरून काढण्यासाठी बगॅससह सुर्यप्रकाश टाकाऊ पदार्थ ऊसाचे पाचट यापासून स्वच्छ आणि पर्यावरणपुरक एक लाख मेगावॉट वीजनिर्मितीचे उद्दिष्ठ केंद्र सरकारच्या नवीन आणि अपारंपारिक उर्जा मंत्रालयाने निश्चित केले आहे. असे प्रतिपादन भारत सरकारच्या नवीन आणि अपारंपारिंक उर्जा मंत्रालयाचे सल्लागार डॉ. एन. पी. सिंग यांनी केले.
सहवीज निर्मिती प्रकल्पातील तांत्रिक कर्मचाऱ्यांसाठी एक डिसेंबर ते सहा जानेवारी दरम्यान विविध सहा साखर कारखान्यातील सहवीज निर्मिती प्रकल्पांमध्ये आॅपरेटर्स ट्रेनिंग आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभ किसन वीर कारखाना कार्यस्थळावरील यशवंतराव चव्हाण सभागृहात पार पडला झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एमएनआरईचे संचालक डॉ. आर. एन. सावंत, सहाय्यक संचालक (साखर) दीपक तावरे, किसनवीर कारखान्याचे अध्यक्ष मदन भोसले, उपाध्यक्ष गजानन बाबर, सोनहिरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मोहनशेठ कदम, कोजन इंडियाचे संचालक अरविंद किलोस्कर, एम. व्ही. शिराळकर यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. आर. एन. सावंत, मदन भोसले, डॉ. गौड यांनी मनोगत व्यक्त केले. कोजन इंडियाचे कार्यकारी संचालक संजीव बाबर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन कोजन इंडियाचे सचिव सुनिल नातू यांनी केले. गजानन बाबर यांनी आभार मानले. यावेळी अभय कुलकर्णी, अनिता खताळ, एस. बी. सिंदकर, धीरज वाघोले, उद्धव शिंगटे, शिरिष धायगुडे, आदींसह कारखाना कर्मचारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Objective of one lakh MW power generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.