रायरेश्वर येथे हिंदवी स्वराज्याचा शपथ दिवस साजरा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:34 IST2021-05-03T04:34:02+5:302021-05-03T04:34:02+5:30
वाई : रायरेश्वर युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, यांच्यावतीने श्री क्षेत्र रायरेश्वर येथे शासकीय नियमांचे पालन करीत हिंदवी स्वराज्याचा शपथ ...

रायरेश्वर येथे हिंदवी स्वराज्याचा शपथ दिवस साजरा
वाई : रायरेश्वर युवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, यांच्यावतीने
श्री क्षेत्र रायरेश्वर येथे शासकीय नियमांचे पालन करीत हिंदवी स्वराज्याचा शपथ दिवस साध्या स्वरूपात साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवरायांनी वयाच्या सोळाव्या वर्षी किल्ले रायरेश्वरला करंगळीतील रक्ताभिषेक करीत मावळ्यांसह स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. तो दिवस स्वराज्याच्या आनाभाका घेऊन अठरापगड जाती आणि बारा मावळातील मावळ्यांसह एक हिंदवी स्वराज्याचा संकल्प केला. हिंदवी साम्राज्य उभे राहिले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, रायरेश्वर येथे शिवमंदिरात अभिषेक करून, तसेच शिवप्रतिमेचे पूजन केले. यावेळी शिवाजी साळेकर यांनी २७ एप्रिल हा हिंदवी स्वराज्य संकल्प दिवसानिमित्त कोरोनाच्या या भयंकर संकटात शिवभक्तांना संदेश देताना प्रतिष्ठानच्यावतीने कोरोना काळात सर्वांनी पुढे येऊन रक्तदान, प्लाझ्मा दान, तसेच सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी रायरेश्वर युवा प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सुनील साने, तालुका उपकार्याध्यक्ष धनाजी पवार, पुणे जिल्हाध्यक्ष राहुल कंक, जिल्हाध्यक्ष विलास गुढेकर शिवभक्त गणेश चऱ्हाटे, मोडी लिपी तज्ज्ञ इतिहास संशोधक संतोष खोपडे, तसेच योगेश शेंडगे, प्रेम साने उपस्थित होते.