फळझाडांचे पालनपोषण घरच्या सदस्यासारखे करा : चद्रकांत दळवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:41 IST2021-08-26T04:41:36+5:302021-08-26T04:41:36+5:30
खटाव : ‘वृक्षारोपण केले म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे नाही. तर ती वाढते. सर्वांनी या फळझाडांचे पालनपोषण घरच्या सदस्यासारखे ...

फळझाडांचे पालनपोषण घरच्या सदस्यासारखे करा : चद्रकांत दळवी
खटाव : ‘वृक्षारोपण केले म्हणजे आपली जबाबदारी संपली, असे नाही. तर ती वाढते. सर्वांनी या फळझाडांचे पालनपोषण घरच्या सदस्यासारखे करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच त्याचे योग्यरितीने नियोजन करण्याची आवश्यकता आहे,’ असे मत माजी विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी यांनी व्यक्त केले.
हनुमान विद्यालय, निढळच्या परिसरात जवळपास २०० ते २५० फळझाडांची लागवड करण्यात आली. यावेळी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. विविध प्रकारची फळझाडे यावेळी लावण्यात आली. हायस्कूलचा परिसर वृक्षमय झालाच आहे. त्यातच या वृक्ष लागवडीमुळे अधिकच शोभा येईल, असे मत दळवी यांनी व्यक्त केले.
या कार्यक्रमप्रसंगी पंचायत समिती सदस्य आनंदराव भोंडवे, माजी सरपंच श्रीमंत निर्मळ, विष्णू पवार, यशवंत जाधव, श्रीकांत घाडगे, संदीप निर्मळ, श्रीकांत पवार, संदीप दळवी, संतोष खुस्पे, मुख्याध्यापक जगदीश निर्मळ, एस. एन. कांबळे व सर्व शिक्षक, स्कूल कमिटीचे सदस्य हणमंत यादव, भीमराव माने, तात्या निर्मळ, संजय खुस्पे, प्रशांत घाडगे, किशोर खुस्पे, मोहन शिंदे, किरण गाढवे, अविनाश जाधव उपस्थित होते.
२५खटाव
निढळ येथील हनुमान विद्यालय येथे वृक्षारोपण करताना विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पंचायत समिती सदस्य आनंदराव भोंडवे, माजी सरपंच श्रीमंत निर्मळ व मान्यवर उपस्थित होते. (छाया : नम्रता भोसले)