शहरं
Join us  
Trending Stories
1
भूसंपादनाअभावी ‘समृद्धी’ विस्तार निविदा रद्द, ‘शक्तिपीठ’च्या आराखड्यात बदल शक्य: CM फडणवीस
2
भारताची युद्धक्षमता वाढणार, ७९ हजार कोटींची शस्त्रखरेदी; प्रगत नाग क्षेपणास्त्राचा समावेश
3
२२३ एकर भूखंड सोलर डिफेन्स अँड एरोस्पेसला; औद्योगिक भविष्यास नवे पंख देणारी गुंतवणूक 
4
पीडीपी, काँग्रेसचा नॅशनल कॉन्फरन्सला पाठिंबा; राज्यसभेच्या ४ जागांसाठी नवे राजकीय समीकरण
5
भाऊबीजनिमित्ताने राज-उद्धव पुन्हा आले एकत्र; आता युतीच्या घोषणेची उत्सुकता
6
इंडिया आघाडीचे ठरले! तेजस्वी यादव बिहारच्या मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार; सर्व पक्षांचा पाठिंबा
7
बिहार निवडणूक २०२५: मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार नितीश कुमारच; ‘एनडीए’ने केले नाव जाहीर
8
अमेरिकेकडून रशियाची कोंडी; दोन ऑइल कंपन्यांवर निर्बंध, युक्रेन युद्ध थांबविण्यासाठी नीती
9
भारत रशियाकडून फक्त हे वर्षच तेलखरेदी करणार, मोदींचे मला आश्वासन; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
10
हिमालयातील पाण्यात १४ वर्षांत ९ टक्के वाढ; केंद्रीय जल आयोगाच्या अहवालातील निष्कर्ष
11
सत्ताधारी पक्षाचे आमदारही फेक नरेटिव्ह सेट करत आहेत का? काँग्रेस नेत्यांचा भाजपला सवाल
12
मुंबई ते नेवार्क एअर इंडिया विमानाचा यू टर्न; ३ तासांनी वैमानिकाला तांत्रिक बिघाडाचा संशय
13
दिवाळी, छठ पूजेस १०.५ लाख प्रवासी यूपी, बिहारला; मुंबईतून आतापर्यंत १४०० पेक्षा जास्त फेऱ्या
14
कबुतरांसाठी जैन मुनींचे उपोषण; १ नोव्हेंबरपासून आझाद मैदानात होणार सुरुवात
15
IND W vs NZ W : नवी मुंबईत विक्रमांची 'बरसात'! धमाकेदार विजयासह टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये एन्ट्री
16
BSF च्या इतिहासात पहिल्यांदाच महिला कॉन्स्टेबलला ५ महिन्यात मिळालं प्रमोशन; कोण आहे शिवानी?
17
खुलासा! ट्र्म्प यांच्या 'या' पाऊलामुळे चीन घाबरला?; चिनी कंपन्यांनी रशियन तेल खरेदी बंद केली
18
MBS च्या ड्रीम प्रोजेक्टनं जग हैराण; काय आहे इस्लामिक देशाचा ७ अब्ज डॉलरचा 'लँड ब्रिज प्लॅन'?
19
भूषण गवई यांच्यानंतर कोण होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश?; केंद्र सरकारनं सुरू केली प्रक्रिया
20
नाग मिसाइल, टॉरपीडो आणि तोप...सैन्याची ताकद वाढणार; तिन्ही सैन्यदलासाठी ७९ हजार कोटी मंजूर

जिल्ह्यात बाधितांचा आकडा अकराशेच्या टप्प्यावर, नवे ४९ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 13:27 IST

सातारा जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, बुधवारी आणखी ४९ नवे बाधित रुग्ण आढळून आले तर एका बाधिताचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात बाधितांचा १०९४ तर बळींचा आकडा ४६ वर पोहोचला आहे. दरम्यान, २९८ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात बाधितांचा आकडा अकराशेच्या टप्प्यावर एका बाधिताचा मृत्यू : २९८ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह

सातारा : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून, बुधवारी आणखी ४९ नवे बाधित रुग्ण आढळून आले तर एका बाधिताचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यात बाधितांचा १०९४ तर बळींचा आकडा ४६ वर पोहोचला आहे. दरम्यान, २९८ नागरिकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.जिल्ह्यात गत दोन महिन्यांपेक्षा कोरोना बाधितांची संख्या आता दुपटीने वाढू लागली आहे. रोज पन्नास ते सत्तर बाधित रुग्ण आढळून येत आहेत. महिनाभरापूर्वी कोरोनामुक्तीचे प्रमाण सर्वाधित होते. मात्र, हे प्रमाण आता कमी होऊन बाधितांचे प्रमाण वाढलेय.

कोरेगाव तालुक्यातील जांभ येथील ३३ वर्षीय पुरुषाचा खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान बुधवारी सकाळी मृत्यू झाला. तो कोरोना बाधित असल्याचे खासगी प्रयोगशाळेच्या अहवालानुसार स्पष्ट झाले होते. दरम्यान, कऱ्हाड तालुका तर कोरोनाचा पुन्हा हॉटस्पॉट ठरू लागला आहे. बुधवारी कºहाड तालुक्यात २२ बाधित रुग्ण आढळून आले.

त्यामध्ये महारुगडेवाडीमधील २१ वर्षीय युवक आणि ४६ वर्षीय पुरुष, ७५ वर्षीय महिला, रुक्मिणी नगरातील ३९ वर्षीय पुरुष, तारुखमधील २२ वर्षीय युवक ५४, ३२,४०, ३५ वर्षीय महिला, ११ वर्षीय मुलगा, ६० तसेच ४४ पुरुष, तुळसनमधील ३ वर्षाची बालिका, कऱ्हाड शहरातील शनिवार पेठतील २२ आणि २६ वर्षीय युवक, २३ वर्षीय युवती,४५,७० वर्षीय महिला, ओंडमधील ३६ वर्षीय पुरुष त्याचबरोबर मलकापुरातील ३६, ३४ वर्षीय पुरुष तसेच १८ वर्षीय युवतीचा समावेश आहे.

पाटण तालुक्यातही नवे सात रुग्ण आढळून आले. नवसरीतील १७ वर्षीय मुलगा आणि १७ वर्षीय मुलगा तसेच तसेच ३६ वर्षीय महिला, पालेकरवाडीमधील ५० वर्षीय पुरुष, सदा दाढोलीतील ११ वर्षीय मुलगा आणि २९ वर्षीय महिलेसह ४ वर्षाच्या बालिकेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.सातारा शहरातही आता कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. रविवार पेठेतील ३९ वर्षीय पुरुषासह तालुक्यातील नागठाणेतील ४५ वर्षीय महिलेचाही अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्याचबरोबर माण तालुक्यातील खडकी पाटोळेतील ६२ वर्षीय पुरुषासह खटाव तालुक्यातील निमसोडमधील ६८ वर्षीय महिला, कन्नवडी मायणी येथील ७५ वर्षीय पुरुष, राजाचे कुर्लेतील ३३ वर्षीय पुरुषाचाही अवाहल कोरोना बाधित आलाय. तसेच कोरेगाव तालुक्यातील करंजखोपमधील ८ वर्षाच्या बालकालाही कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

खंडाळा तालुक्यातील शिरवळमध्ये सहाजण बाधित आढळून आले. त्यामध्ये २२ वर्षीय युवक, २४, ३२ आणि २५ वर्षीय युवक तसेच १९ वर्षीय युवती आणि ४९ वर्षीय महिलेचा समावेश आहे. फलटण तालुक्यातील कुरवलीमधील ४ वर्षीय आणि कोरेगावधील ५ वर्षीय बालक, जाधववाडीतील ४३ वर्षीय पुरुष, आंदरुडमधील ३५ वर्षीय पुरुष, गुणवरेतील ५१ वर्षीय पुरुषासह जावळी तालुक्यातील मार्ली येथील ८२ वर्षीय वृद्धाचाही अहवाल कोरोना बाधित आलाय.दरम्यान, पुणे तसेच कऱ्हाड मधील कृष्णा मेडिकल कॉलेज येथे तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या २९८ नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत १०९४ बाधित रुग्ण आढळून आले असून, यापैकी ७४० जण कोरोनातून मुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे तर ४६ जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या ३०७ बाधित रुग्णांवर विविध ठिकाणी विलगीकर कक्षात उपचार सुरू आहेत.संसर्गामुळे बाधितांचे प्रमाण वाढतेय..पुणे, मुंबईहून प्रवास करून आलेल्या नागरिकांमुळे आत्तापर्यंत बाधितांचे प्रमाण वाढत होते. मात्र सध्या यालट परिस्थिती असून, प्रवास करून आलेल्यांपेक्षा स्थानिक रहिवाशांमधील संसर्गामुळेच बाधितांचे प्रमाण वाढू लागल्याचे आरोग्य विभागाच्या निदर्शनास येत आहे. बुधवारी आढळून आलेल्या नव्या रुग्णांमध्ये ३७ निकट सहवासित, प्रवास करुन आलेले ५, सारीच्या आजाराचे ५, व अन्य १ एकाचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर