शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

कोरोना घटला.. निर्धास्तपणा वाढला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2021 12:39 IST

सचिन काकडे सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या पहिला व दुसऱ्या लाटेने अक्षरश: तांडव घातले. या लाटेत कधीही भरून न ...

सचिन काकडेसातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या पहिला व दुसऱ्या लाटेने अक्षरश: तांडव घातले. या लाटेत कधीही भरून न येणारे नुकसान झाले. आता तिसरी लाट येऊ नये, ही अपेक्षा आरोग्य यंत्रणा व सर्वसामान्य नागरिक व्यक्त करीत आहेत; मात्र नागरिकांचा निर्धास्तपणा काही केल्या कमी होईना. कोरोनाची लाट ओसरत असताना सोशल डिस्टन्सचे पालन न करणे, मास्कचा वापर न करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे असे प्रकार नागरिकांकडून वारंवार केले जात आहेत. तर दुसरीकडे प्रशासनाला देखील मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईचा विसर पडल्याचे दिसते.

निष्काळजीपणा सोडून थोडी काळजी घ्याच..

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात कोरोना रुग्ण व मृतांनी उच्चांक गाठला. दररोज दोन ते अडीच हजार रुग्ण आढळून येत होते. तर ४५ ते ५० रुग्ण दगावत होते. एकवेळ अशी होती की बाधितांना उपचारासाठी बेडही मिळत नव्हते. त्यामुळे हजारो रुग्ण घरातूनच उपचार घेत होते. आरोग्य यंत्रणा व नागरिकांनी घेतलेल्या काळजीमुळे गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यात कोरोनाची लाट ओसरू लागली आहे. आता पूर्वीसारखी परिस्थित नसली तरी नागरिकांनी निष्काळजीपणा सोडून स्वत:ची व इतरांची काळजी घेणे गरजेचे आहे.

या होतायत चुका

- कोरोना गेला, या अविर्भावात प्रत्येक नागरिक वावरु लागला आहे.

- किराणा, कापड दुकाने, भाजी मंडई, बाजारपेठेत प्रचंड गर्दी होत आहे.

- बहुतांश नागरिक मास्क वापरण्याचीही तसदी घेत नाहीत.

- कोरोना नियमावलीचे पालन केले जात नाही.

- स्थानिक प्रशासनाकडूनही कोणतीच कारवाई केली जात नाही.

हे करायलाच हवं

- गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा

- मास्कचा नियमित वापर करा

- एकच मास्क सातत्याने वापरु नका

- सॅनिटायझरचा वापर करा

- बाहेरून घरी आल्यानंतर हात स्वच्छ धुवा

 कोरोनाने कोणी घरातील कर्ता पुरुष गमावला तर कोणी आई, वडील. हा भीषण संकटातून आता जो-तो सावरू लागला आहे. कोरोनाचे संक्रमण कमी होऊन परिस्थिती पूर्वपदावर येत आहे; मात्र नागरिकांनी गाफील न राहाता या छुप्या शत्रूपासून स्वत:ची व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायलाच हवी. - श्रीरंग काटेकर, सातारा.

 जिल्ह्यात व्यापक स्वरूपात जनजागृती झाली. लसीकरणही मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे कोरोना संक्रमण कमी झाले आहे. नागरिकही आता योग्य ती काळजी घेत आहेत. तरीही नागरिकांनी मास्कचा नियमित वापर करून गर्दीत जाणे टाळावे. तरच कोरोना संक्रमण पूर्णपणे आटोक्यात येईल.- डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या