धुमश्चक्रीप्रकरणी अटक होणाºयांची संख्या सहावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 19:18 IST2017-10-08T19:18:43+5:302017-10-08T19:18:49+5:30
सातारा येथील सुरुचि बंगल्यावर झालेल्या धुमश्चक्रीमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. शेखर उर्फ संतोष बबन चव्हाण (रा. शनिवार पेठ, सातारा) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने दि. १३ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणात अटक होणाºयांची संख्या सहावर पोहोचली आहे.

धुमश्चक्रीप्रकरणी अटक होणाºयांची संख्या सहावर
सातारा, 8 : येथील सुरुचि बंगल्यावर झालेल्या धुमश्चक्रीमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून शाहूपुरी पोलिसांनी आणखी एकाला अटक केली. शेखर उर्फ संतोष बबन चव्हाण (रा. शनिवार पेठ, सातारा) असे त्याचे नाव आहे. न्यायालयाने दि. १३ पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, याप्रकरणात अटक होणाºयांची संख्या सहावर पोहोचली आहे.
येथील सुरुचि बंगल्यावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास जोरदार धुमश्चक्री उडाली होती. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात दोन्ही गटांकडून गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. पोलिसांनी दोन्ही राजे गटांच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यास सुरुवात केली आहे.
शनिवारपर्यंत पाच कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. त्यामध्ये आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले गटाच्या चौघांना तर खासदार उदयनराजे भोसले गटाच्या एका कार्यकर्त्याचा समावेश होता. तसेच आता सातारा शहर पोलिसांनी शेखर उर्फ संतोष चव्हाण याला पकडून शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले.
शाहूपुरी पोलिसांनी चव्हाणला अटक केली आहे. न्यायालयात हजर केल्यावर दि. १३ पर्यंत चव्हाणला पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. चव्हाण हा उदयनराजे गटाचा कार्यकर्ता असल्याचे पोलिसांनी सांगितले.