..आता ‘खरेदीविक्री’साठी चढाओढ

By Admin | Updated: May 19, 2015 00:31 IST2015-05-18T22:08:49+5:302015-05-19T00:31:31+5:30

नऊ संघांत रणकंदन : काँगे्रस-राष्ट्रवादीतच चुरस; भाजप-शिवसेनाही घुसण्याच्या तयारीत

Now, there's a bout for 'buying' | ..आता ‘खरेदीविक्री’साठी चढाओढ

..आता ‘खरेदीविक्री’साठी चढाओढ

सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक पार पडल्यानंतर आता जिल्हा खरेदीविक्री संघासह जिल्ह्यात आठ तालुका खरेदीविक्री संघाच्या निवडणुकांचा कार्यक्रमही जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने हा कार्यक्रम जाहीर केला असून, १५ मे पासून अर्ज दाखल करून घ्यायला सुरुवात झाली आहे. १४ जून रोजी मतदान होणार असून, १५ जून रोजी मतमोजणी होणार आहे. काँगे्रस आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमधून आता चुरस पाहायला मिळत आहे. भाजप-शिवसेनेचे कार्यकर्तेही या सहकारी संस्थांमध्ये घुसण्याच्या तयारीला लागले आहेत.जिल्हा खरेदीविक्री संघासाठी २१ संचालक निवडून द्यायचे आहेत. यामध्ये तालुका खरेदीविक्री संघाचे ६, विकास सेवा सोसायट्यांचे ५, दूध उत्पादक व पुरवठा संघाचे २, सहकारी ग्राहक व प्रक्रिया व इतर संस्थांचा १, व्यक्ती भागधारक २, महिला राखीव २, अनुसूचित जमाती १, भटक्या जमाती १, इतर मागास १ अशा जागांचा समावेश आहे. यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीकांत श्रीखंडे यांची नियुक्ती झाली आहे. भूविकास बँकेमध्ये त्यांचे कार्यालय राहणार आहे. अर्ज भरण्याची अंतिम मुदत १९ मे रोजी दुपारी ३ पर्यंत आहे. २० रोजी चिन्ह वाटप व २१ रोजी उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. २२ ते ५ जूनदरम्यान, अर्ज मागे घेता येणार आहे. १४ जून रोजी मतदान होणार असून, १५ रोजी मतमोजणी होणार आहे.
दरम्यान, सातारा तालुका खरेदीविक्री संघाचे १७ संचालक निवडण्यासाठी दि. १४ जून रोजी मतदान होणार आहे. पाटण तालुका खरेदीविक्री संघाच्या १७ संचालक निवडण्यासाठी १५ जून रोजी मतदान होणार आहे. खंडाळ्यात १५ संचालक निवडण्यासाठी १५ जून रोजी मतदान होईल. जावळीत १७ संचालक निवडण्यासाठी १४ जूनला मतदान होईल. वाईत १७ संचालक निवडण्यासाठी १५ जून रोजी मतदान होईल. खटावमध्ये १७ संचालक निवडण्यासाठी १४ जूनला मतदान होईल.
फलटणमध्ये १७ संचालक निवडण्यासाठी १३ ला मतदान होईल. कोरेगावमध्ये १५ संचालक निवडण्यासाठी १४ जून रोजी मतमोजणी होणार आहे. प्रत्येक ठिकाणी मतदानानंतर दुसऱ्या दिवशी मतमोजणी केली जाणार आहे. गृहनिर्माण मतदारसंघाच्या १३ जागांसाठी १४ जून रोजी मतदान केले जाणार आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेसाठी या मतदारसंघाचे नेतृत्व खासदार उदयनराजे भोसले करत आहेत. साहजिकच या मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी हालचाली केल्या जातील. इतर खरेदी विक्री संघातही विरोधकांअभावी निवडणुका बिनविरोध होण्याची चिन्हे आहे. (प्रतिनिधी)

विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष
जिल्ह्यातील खरेदी विक्री संघांवर राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. यासह इतर सहकारी संस्थांमध्ये असणाऱ्या सत्तेच्या आधारावरच राष्ट्रवादीचे राजकारण बळकटपणे चालते. या राजकारणाला शह द्यायचा असेल तर प्रथम याठिकाणी शिरकाव करण्याची गरज आहे, हे ओळखून काँगे्रससह शिवसेना, भाजप हे विरोधकही तयारीला लागले आहेत. विरोधात का होईना पण निवडून जायची तयारीही काहींनी केली आहे.
आता विरोधक कितपत तयारी करतात हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. डीसीसी बँकेच्या निवडणुकीतही काहींनी रणशिंग फुंकले होते. पण ऐनवेळी अनेकांनी शेपूट घातले होते.

Web Title: Now, there's a bout for 'buying'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.