शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

'ठाकरें'च्या तोंडी आता 'राऊतां'ची भाषा, मंत्री शंभूराज देसाईंची टीका

By प्रमोद सुकरे | Updated: July 12, 2023 18:14 IST

अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तार

कराड : आम्ही सगळे बाजूला गेल्यापासून खासदार संजय राऊतचउद्धव ठाकरे यांच्याबरोबर जास्त आहेत. त्यामुळे त्यांच्या कानावर सध्या राऊतांचीच भाषा जास्त पडत आहे. साहजिकच त्याचा परिणाम उद्धव ठाकरे यांच्यावर झालेला आहे. त्यामुळे ठाकरेंच्या तोंडी राऊतांची भाषा ऐकायला मिळत आहे अशी टिका पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केली. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत ठाकरेंनी केलेला 'कलंक' हा शब्दप्रयोग अत्यंत चुकीचा आहे म्हणूनच लोकांच्यातून तीव्र भावना उमटत असल्याचे मत देसाई यांनी व्यक्त केले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत वापरलेल्या ‘कलंक’ या शब्दावरून महाराष्ट्राच्या राजकारणात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. यावर पालकमंत्री शंभूराज देसाईंनी यांना छेडले असता ते बोलत होते.देसाई म्हणाले, "उद्धव ठाकरे हे संयमी नेते आहेत. मात्र, संजय राऊत जवळ असल्याने त्यांच्या सवयीचा परिणाम ठाकरेंवर बहुदा झाला असावा. त्यातूनच ठाकरे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत बोलले असावेत. आता ॲक्शनला रिॲक्शन येत आहे. जनतेतून यावर तीव्र संताप उमटत आहेत.उद्धव ठाकरेंची यापूर्वीची भाषणे आम्ही ऐकलेली आहेत. एक संयमी आणि शांत वक्तृत्व उद्धव ठाकरेंचे असायचे. परंतु गेल्या वर्ष भरात आम्ही जी भूमिका एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वीकारली. तेव्हापासून त्यांची भाषाशैली बदलत राहिली. आता महिना-दोन महिन्यामध्ये तर उद्धव ठाकरेंच्या वक्तव्यामध्ये एक वेगळेपणाच दिसतोय. याचे कारण संजय राऊतच आहेत. तेच त्यांच्या सतत  जवळ असतात. सवयीचा परिणाम होतोच. राऊत जी भाषा बोलतात, जे शब्द वापरतात. ते शब्द उद्धव ठाकरेंच्या कानावर पडत असल्यामुळे कदाचित त्यांच्याकडून फडणवीस यांच्याबद्दल एक शब्द गेला असेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर प्रेम करणारे लाखो चाहते आहेत. ते व्यक्तिमत्व राज्याला पुढे घेऊन जाणारे आहे. फडणवीस हे उत्कृष्ट संसद पट्टू आहेत. अशा एका अभ्यासू आणि अनुभवी राज्याला पुढे घेऊन जाणाऱ्या नेतृत्वाबाबत कलंक  हा शब्द प्रयोग उद्धव ठाकरे यांच्याकडून होणे हे महाराष्ट्रातील कुणालाच रुचलेले नाही. असेही देसाई म्हणाले.

अधिवेशनापूर्वी मंत्रीमंडळ विस्तारसोमवारपासून मंत्रिमंडळाचे तीन आठवड्यांचे पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे.त्यामुळे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच मत्रीमंडळ विस्तार व खाते वाटप करतील. मंत्रिमंडळ विस्तार व खाते वाटप पावसाळी अधिवेशनापूर्वी होईल, असे ही देसाई यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरShambhuraj Desaiशंभूराज देसाईUddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत