शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

भरसभेत आता झाली का ‘पंचाईत’!

By admin | Updated: February 2, 2015 00:04 IST

तक्रारपेटी निवांत बसवा : आधी सदस्यांच्या तक्रारी तरी मिटवा !

प्रमोद सुकरे- कराड  पंचायत समितीचा भोंगळ कारभार सातत्याने चव्हाट्यावर येतोय. तालुक्यातील सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ऐकायलाच कुणाला वेळ नाही; मग सोडवायचे तर दूरच. तिथे लोकांना मनमोकळं करायला एक तक्रारपेटी होती़ तीही सध्या गायब आहे़ आता तर महिला सदस्यांना आपल्या प्रश्नांना न्याय मिळत नाही म्हणून अश्रू ढाळत चक्क मासिक सभेत दाद मागायला लागतेय. त्यामुळे, ‘साहेब, तक्रारपेटी निवांत बसवा; पण आधी महिला सदस्यांच्या तक्रारी तरी मिटवा,’ असचं म्हणायची वेळ आलीय़ कऱ्हाडला राजकीय पंढरी म्हणून ओळखलं जातं़ दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी राजकारणाचा आदर्श घालून दिलाय; पण त्याच पायघड्यावरून चालताना पंचायत समिती सदस्यांनाच कुठे ‘देव’ सापडेना झालाय़ तो हा ‘विठ्ठल’ बरवा... म्हणत, पंचायत समितीचा गाडा पुढे सरकतोय खरा; पण इथे कुणाला कुणाची ‘दया’ही येत नाही अन् त्यामुळे आता काम करण्यात ‘राम’पण राहिला नाही म्हणे !पंचायत समितीच्या सभागृहात राजकीय त्रांगडं आहे़ कोणाचं तरी ओझं कोणाच्या तरी खांद्यावर ठेवत सोयीची युतीच येथे पाहायला मिळतेय. काँग्रेसचे संख्याबळ जास्त असतानाही राष्ट्रवादीचा सभापती अन् अपक्षांचा उपसभापती इथे पाहायला मिळतोय़ तर काँग्रेसचे विरोधी पक्ष नेतेपद असणाऱ्यांच्या हातात भाजपचं कमळ फुललेलं दिसतंय़ त्यामुळे ‘मूह मे राम और बगल मे़़़’ या पद्धतीने कोण शत्रू अन् कोण मित्र, हेच कळेनास झालंय. इथे सत्तेत कोण अन् सत्तेबाहेर कोण, हेच कधी-कधी समजत नाही़ नोकरीत नवीन असणाऱ्या तरुण अधिकाऱ्याच्या हातात हा कऱ्हाडचा ‘फड’ मिळालाय़ हर‘तरे’ने ते प्रशासनावर पकड बसविण्याचा प्रयत्न करत आहेत; पण गडी अजून ‘मुरलेला’ नाही़ केवळ पंचायत समितीतील राजकीय अस्थिरतेमुळे तो ‘तरलेला’ आहे एवढेच़ नाहीतर कऱ्हाडात काम करायचं सोपं नव्हं बरं ! पंचायत समितीच्या प्रवेश द्वारावरच तालुक्यातील जनतेचे प्रश्न मांडता यावेत म्हणून अनेक वर्षांपासून तक्रारपेटी होती; पण मोठ्या उंचीच्या या अधिकाऱ्यांनी ती पेटीच चार महिन्यांपूर्वी काढून टाकलीय़ अन् हो विचारल्यावर म्हणे, ‘त्याचं कुलूप गंजलं होतं म्हणून काढलीय़ बसवायची आहे; पण त्याला वेळ लागेल़’ आता त्यांना कधी वेळ मिळणार आहे ‘देव’ जाणे़ तक्रारपेटी फोडली तेव्हा त्यात ३० तक्रारी होत्या म्हणे! अन् कुलूप गंजल्याने ते फोडावे लागले. म्हणजे, त्या तक्रारी कधीच्या, कुणाच्या अन् आता त्याचं काय झालं, हे माहीतही नाही; पण हे कमी की काय म्हणून शुक्रवारच्या सभेत महिला सदस्यांवर आपल्या तक्रारींची तड लावली जात नाही म्हणून गहिवरण्याची वेळ आली; पण राजकारणात माहीर असणाऱ्या ‘त्या’ जोडगोळीनं वेळ मारून नेली. प्रश्नांची उत्तरे मिळालीच नाहीत़ त्यामुळे अनेक प्रश्नही अनुत्तरित राहतात़ पंचायत समिती सदस्यांचीच अशी ‘पंचाईत’ होत असेल, तिथे सर्वसामान्य जनतेची काय अवस्था असेल. याचा विचारच न केलेला बरा़ पदाधिकाऱ्यांच्या तक्रारींची दखल घेतली जात नसेल, तर सामान्यांच्या तक्रारींचे काय ? इथल्याच तक्रारी संपत नसतील, तर नसत्या नव्या तक्रारी कशाला म्हणून तर तक्रारपेटी काढली नसेल ना ? तक्रारपेटीच काढण्यापेक्षा काही तक्रारीच होणार नाहीत, असे प्रशासन राबविण्याची खरंतर गरज आहे; पण हे लक्षात कोण घेतो़ तेव्हा ‘साहेब, तक्रारपेटी निवांत बसवा; पण आधी सदस्यांच्या तरी तक्रारी मिटवा म्हणजे झालं !’ ‘भाव’ वाढलाच नाहीअधिकारी दखल घेत नसल्याच्या कारणावरून एक ‘राजा’ मनाचा सदस्य दीड वर्षापूर्वी या सभागृहातून निषेध म्हणून मधूनच उठून गेला होता; पण त्याचे सोयरसुतक फारसे कोणी घेतले नाही़ शेवटी मोठ्या मनाने तो सदस्य पुन्हा सभागृहात येऊन बसू लागलाय. राजकीय पार्श्वभूमी असणाऱ्या सदस्यांचा ‘भाव’ तरीही सभागृहात वाढलेला दिसत नाही़ मग नवख्या अन् महिला सदस्यांची कोण किती दाद घेणार? हाच खरा प्रश्न आहे.