शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्ज फेडू शकत नसल्यानं पाकिस्तानचा मास्टरस्ट्रोक; सौदीला गजब ऑफर, अमेरिकेचेही टेन्शन वाढलं
2
"पाकिस्तानच्या संविधानात 'असे' लिहिले आहे, आपल्या संविधानात नाही...!" नितेश राणेंच्या 'त्या' विधानावर नेमकं काय म्हणाले ओवेसी? 
3
समृद्धी महामार्गाच्या घोटाळ्यातून पन्नास खोके, एकदम ‘ओके’! हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
4
‘१४० कोटी जनतेच्या गरजेसाठी कुठूनही स्वस्तात तेल आणू’, ट्रम्प यांच्या ५०० टक्के टॅरिफच्या धमकीला भारताचं थेट उत्तर 
5
‘गुन्ह्यांची माहिती लपवणाऱ्या किशोरी पेडणेकरांची उमेदवारी रद्द करा’, निलेश राणे यांची मागणी  
6
VIDEO: प्रभासच्या चाहत्यांचा थिएटरमध्ये धुडगूस; ‘द राजा साब’च्या स्क्रीनिंगदरम्यान आणल्या मगरी
7
'PM मोदी आणि ट्रम्प यांच्यात 8 वेळा चर्चा', अमेरिकन मंत्र्याचा 'तो' दावा भारताने फेटाळला...
8
"Bombay is not Maharashtra City..."; भाजपा नेत्याच्या विधानानं नवा वाद; उद्धवसेनेने सुनावले
9
महिला सक्षमीकरणाचे नवे मॉडेल! सोमनाथ मंदिरामुळे शेकडो महिलांना मिळाली रोजगाराची सुवर्णसंधी
10
Gautami Kapoor : राम कपूरकडे नव्हतं काम, पत्नी गौतमीने सांभाळलं घर; सांगितला लग्नानंतरचा अत्यंत कठीण काळ
11
२८ जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन; १ फेब्रुवारीला बजेट; सामान्यांची 'अच्छे दिन'ची प्रतीक्षा संपणार?
12
उमेदवारांची माहिती अद्याप 'अंधारात', निवडणुकीतील ४६९ उमेदवारांची शपथपत्रे अपलोडच केली नाहीत!
13
"झुकणार नाही..., शत्रूला परिणाम भोगावे लागतील!"; इराणमध्ये जनता रस्त्यावर उतरली असताना नेमकं काय म्हणाले खामेनेई?
14
"एक दिवस हिजाब घालणारी महिला पंतप्रधान बनेल, पण कदाचित मी जिवंत नसेन", सोलापुरात ओवैसींचा अजित पवारांवर हल्ला
15
हिमाचल प्रदेशच्या सिरमौरमध्ये भीषण अपघात; दरीत कोसळली बस, ८ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'अजित पवार म्हणाले, भाजपाने अडीच-अडीच हजार मते आधीच ईव्हीएमध्ये भरली आहेत'; राज ठाकरेंचा खळबळजनक दावा
17
Video: मुंबईत महायुतीत तणाव! "५० खोके एकदम ओके..." भाजपा कार्यकर्त्यांनीच शिंदेसेनेला डिवचले
18
Bigg Boss Marathi 6: कातिलों की कातिल राधा पाटील ते सोनावणे वहिनी; 'बिग बॉस मराठी ६'मधल्या कन्फर्म स्पर्धकांची लिस्ट समोर
19
नवी मुंबई: वाशीत कारमध्ये १६ लाख रुपयांची रोकड सापडली, आचारसंहिता पथकाची कारवाई
20
कुजबूज: शिंदे साहेब, खरंच दखल घेतील! त्याग कितपत फळणार?
Daily Top 2Weekly Top 5

आता नाट्य संमेलनाचे यजमानपद मिळावे - शिवेंद्रसिंहराजे भोसले 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 17:07 IST

99th Marathi Sahitya Sammelan: चार दिवसांत ८ लाखांवर साहित्य संमेलनस्थळी भेट

छत्रपती थोरले शाहू महाराज साहित्यनगरी, सातारा : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला असून तब्बल ८ लाख साहित्यरसिकांनी भेट दिली आहे. आता पुढील अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे यजमानपदही साताऱ्याला मिळावे, अशी मागणी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा स्वागताध्यक्ष शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केली.सातारा येथे ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोपप्रसंगी ते बोलत होत. व्यासपीठावर उद्योग व मराठी भाषामंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभुराजे देसाई, आमदार भरत गोगावले, महेश शिंदे, संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील, महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आदी उपस्थित होते.

वाचा: मराठी साहित्य संमेलनात भासली उदयनराजे भोसले यांची उणीव!, साहित्य रसिकांनी बोलून दाखवली खंत शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, दिवंगत अभयसिंहराजे भोसले हे ३२ वर्षांपूर्वी सातारा येथे आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते. त्यानंतर या संमेलनाचे स्वागताध्यक्षपद मला मिळाले याचा विशेष आनंद आहे. त्यावेळप्रमाणेच यंदाचेही संमेलन यशस्वी झाले आहे. संमेलनाच्या चार दिवसांत परिसंवाद, मुलाखती, कविसंमेलने, गझल कट्टा असे विविध कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.

वाचा : अण्णाभाऊ साठे यांना ‘भारतरत्न’ देण्यात यावा

छत्रपती शिवाजी महाराज यांनी मिळविलेल्या स्वराज्याचा विस्तार छत्रपती संभाजी महाराज यांचे पुत्र थोरले शाहू महाराज यांच्या काळात अटकेपार गेला परंतु, त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास झाकोळला गेला आहे. विश्वास पाटील यांनी आपल्या लेखणीतून थोरले शाहू महाराज यांच्या कर्तृत्वावरही प्रकाश टाकावा, असे आवाहन शिवेंद्रसिंहराजे यांनी केले.

सामंत यांच्याशी नाट्यसंमेलनासाठी मैत्री वाढविणारउदय सामंत यांनी साहित्य संमेलनासाठी केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे भरपूर कौतुक केले असले तरी आमची मागणी संपली नाही. आता नाट्यसंमेलनासाठी अशीच मैत्री जोपासावी, अशी मिश्किल भाषेत टिप्पणी केली. या टिपण्णीला सामंत यांनीही आपल्या भाषणात उत्तर देताना हे कौतुक मला महागात पडणार असल्याचे सांगत सहकार्यात कमी पडणार नसल्याची ग्वाही दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Aims to Host Next Natya Sammelan: Shivendrasinharaje Bhosle

Web Summary : Following the successful Sahitya Sammelan, Shivendrasinharaje Bhosle requests Satara to host the next Natya Sammelan. He praised cooperation and highlighted the historical significance of Shahu Maharaj's era.