काळोशी परिसरात ‘स्पीकर’वरून सूचना
By Admin | Updated: August 3, 2014 01:54 IST2014-08-03T01:10:59+5:302014-08-03T01:54:19+5:30
डोंगरकड्यांवरून दगड पडण्याचे सत्र सुरूच

काळोशी परिसरात ‘स्पीकर’वरून सूचना
परळी : काळोशी गावात डोंगरकड्यांवरून दगड पडण्याचे सत्र सुरूच आहे. त्यामुळे काळोशी ग्रामपंचायतीच्या वतीने शनिवारी गायदार कड्याच्या शेजारील गावांत गाडीतून फिरून स्पीकरवरून धोक्याची सूचना दिली जात आहे.
मुसळधार पावसामुळे गायदार कड्याचे छोटे-मोठे दगड कोसळत असल्याने याठिकाणी कोणीही जाऊ नये, जनावरे त्या परिसरात नेवू नयेत, दरड कोसळण्याची भीती आहे, अशा सूचना स्पीकरवरून दिल्या जात आहेत. तीन ते पाच टन वजनाचे मोठे दगडही कोसळत असल्यामुळे दुर्घटना घडू शकते. यासाठी दक्षता म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने गाडी फिरवून ग्रामस्थांना स्पीकरवरून सूचना दिल्या जात आहेत. (वार्ताहर)