शिवथरला गणेशोत्सवाबद्दल पोलिसांच्या मंडळांना सूचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:24 IST2021-09-02T05:24:31+5:302021-09-02T05:24:31+5:30
शिवथर : ‘कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा गणेशोत्सव जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार साजरा करावा,’ असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील ...

शिवथरला गणेशोत्सवाबद्दल पोलिसांच्या मंडळांना सूचना
शिवथर : ‘कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीचा गणेशोत्सव जिल्हा प्रशासनाने दिलेल्या सूचनेनुसार साजरा करावा,’ असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांनी शिवथर (ता. सातारा) येथे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना बैठकीदरम्यान केले. यावेळी गावातील तेरा मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभासद उपस्थित होते.
गणेशाची मूर्ती सार्वजनिक मंडळाकरिता ४ फूट व घरगुती गणपतीकरिता २ फुटांच्या मर्यादेत असावी, आरोग्यविषयक व सामाजिक संदेश असलेल्या जाहिराती कराव्यात, सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी रक्तदान शिबिर आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात यावे, आरती, भजन तसेच अन्य धार्मिक कार्यक्रम आयोजित करताना गर्दी होणार नाही, याची दक्षता घ्यावी, तसेच ध्वनी प्रदूषणासंदर्भातील नियमांचे व तरतुदींचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे, श्रींच्या आगमन व विसर्जन मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. तसेच घरगुती गणेशमूर्तींच्या विसर्जनाची मिरवणूक एकत्रितरित्या काढण्यात येऊ नये, असेही आवाहन पाटील सार्वजनिक मंडळास केले आहे. यावेळी पोलीसपाटील भरत साबळे बीट अंमलदार लक्ष्मण चव्हाण हवालदार गडदे उपस्थित होते.