महाबळेश्वर : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी अपहरण प्रकरणात अटक करण्यात आलेले जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई व संदीप ऊर्फ पिंटू मांडवे यांना मारहाण झाल्याचा आरोप त्यांच्या वकिलांनी महाबळेश्वर न्यायालयात केला. यावर न्यायालयाने पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढत या प्रकरणातील तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश दिले. तसेच अनिल देसाई व संदीप मांडवे यांची प्रत्येकी ५० हजारांच्या जामिनावर मुक्तता करण्याचेही आदेश दिले.सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाच्या निवडीवेळी जिल्हा परिषद सदस्य अनिल देसाई, संदीप मांडवे या दोघांना अटक केली होती. विकास दिनकर शिंदे (वय ४५, रा. सोनगिरवाडी, ता. वाई) यांच्या तक्रारीवरून चौघांवर महाबळेश्वर पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर पोलिसांनी झेडपी अध्यक्षपदाच्या निवडीच्या काही क्षण आधी दोघांना अटक केली. गेल्या तीन दिवसांपासून दोघांवर सिव्हिलमध्ये पोलिस बंदोबस्तात उपचार सुरू होते.दरम्यान, अनिल देसाई व संदीप मांडवे यांना पोलिसांनी मंगळवारी दुपारी महाबळेश्वर न्यायालयात हजर केले. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद न्यायालयाने ऐकून घेतला. या दोघांच्यावतीने ॲड. सदाशिव सानप व ॲड. शिवराज धनावडे, ॲड. श्रीपाद ढाणक यांनी युक्तिवाद करत पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप नोंदविला. पोलिसांनी केलेली अटक चुकीच्या पद्धतीने झाली आहे. देसाई व मांडवे यांनी पोलिसांकडून झालेल्या मारहाणीबाबत तक्रार केली.त्यानुसार न्यायालयाने वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले होते. या वैद्यकीय अहवाल नोंदीवर ठेवण्यात आले. त्यामध्ये दिसणाऱ्या जखमा प्रथमदर्शनी मारहाणीच्या असल्याच्या पुष्टी देतात, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तसेच केस डायरी, रिमांड कागदपत्रे व वैद्यकीय अहवालांचा अभ्यास केला.आरोपींना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर उशिराने हजर करण्यात आले. तपास अधिकाऱ्याने वारंवार मागणी करूनही अटक फॉर्म सादर केले नाहीत, त्यामुळे अटकेचा अचूक वेळ निश्चित करता येत नाही, असाही युक्तिवाद देसाई व मांडवे यांच्या वकिलांनी केला. हा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने दोघांचीही जामिनावर मुक्तता केली.अपहरण झालेले बापूसाहेब शिंदे न्यायालयात हजरज्यांच्या अपहरणाचा दावा करण्यात आला होता ते दिनकर ऊर्फ बापूसाहेब शिंदे हे स्वतः महाबळेश्वर न्यायालयात मंगळवारी हजर झाले होते. यावेळी त्यांनी माझे अपहरण झाले नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
Web Summary : Satara ZP members Desai and Mandve allege assault; court issues notice to investigating officer. Both granted bail after appearing in court.
Web Summary : सतारा जेडपी सदस्य देसाई और मांडवे ने मारपीट का आरोप लगाया; अदालत ने जांच अधिकारी को नोटिस जारी किया। दोनों को जमानत मिली।