शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
2
Ahmedabad Plane Crash Live Updates : भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
3
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
4
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
5
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
6
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
7
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
8
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
9
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
10
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
11
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
12
Ahmedabad Plane Crash: "ज्यांनी जीव गमावला, त्यांना.."; अहमदाबाद विमान दुर्घटनेमुळे कलाकारांनी व्यक्त केली हळहळ
13
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
14
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
15
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
16
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारतीचा भाग कोसळला, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
17
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
18
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
19
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
20
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?

वाळू उत्खननप्रकरणी १९ लाखांच्या दंडाची नोटीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 17:35 IST

sand Satara- कुरणेवाडी येथील कोपरआळा परिसरात ४७ ब्रास वाळू व बामणकी मळ्यानजीक ओढ्यात सहा ब्रास झालेल्या वाळू उत्खननाचा तलाठ्यांनी गुरुवार, दि. ३ रोजी पंचनामा केला होता. या वाळू उत्खननाची गंभीर दखल घेत तहसीलदार बी. एस. माने यांनी धडक कारवाई केली. संबंधितांना १९ लाख १ हजार ६५७ रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. त्यामुळे वाळू उत्खनन करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.

ठळक मुद्देमाणच्या तहसीलदारांची कारवाई कुरणेवाडीमुळे तालुक्यातील वाळूमाफियांचे धाबे दणाणले

कुकुडवाड : कुरणेवाडी येथील कोपरआळा परिसरात ४७ ब्रास वाळू व बामणकी मळ्यानजीक ओढ्यात सहा ब्रास झालेल्या वाळू उत्खननाचा तलाठ्यांनी गुरुवार, दि. ३ रोजी पंचनामा केला होता. या वाळू उत्खननाची गंभीर दखल घेत तहसीलदार बी. एस. माने यांनी धडक कारवाई केली. संबंधितांना १९ लाख १ हजार ६५७ रुपये दंडाची नोटीस बजावली आहे. त्यामुळे वाळू उत्खनन करणाऱ्याचे धाबे दणाणले आहेत.कुरणेवाडी येथील गणेश कलाप्पा आटपाडकर, पोपट बापू आटपाडकर व उत्तम बापू आटपाडकर यांना ही नोटीस दिलेली आहे. त्यांना लेखी खुलासा करण्याबाबत चोवीस तासांचा अवधी दिला आहे.याबाबत माहिती अशी की, कुरणेवाडी येथील कोपरआळा व बामणकी मळ्यानजीक ओढ्यात गणेश आटपाडकर, पोपट आटपाडकर व उत्तम आटपाडकर हे ३ डिसेंबर रोजी ट्रँक्टर व ट्राँलीद्वारे वाळू उत्खनन व वाहतूक करीत असताना तलाठ्यांना आढळले. तलाठ्यांनी उत्खनन केलेल्या ओढ्यातील जागेचा पंचनामा केला. त्यात कोपरआळा येथ ४७ तर बामणकी मळ्यानजीकच्या ओढ्यात ६ ब्रास असे ५३ ब्रास वाळू उत्खनन केल्याचे दिसून आले.

याबाबत तहसीलदार कार्यालयात तलाठी अहवाल पाठविला होता. त्यानंतर तहसीलदार बी. एस. माने यांनी गणेश आटपाडकर, पोपट आटपाडकर व उत्तम आटपाडकर यांना १९ लाख १ हजार ६५७ रुपये दंडाची नोटीस दिलेली आहे.

कुरणेवाडी हद्दीतील ओढ्यातून ५३ ब्रास वाळू उत्खनन केल्याबाबत ६ हजार गौण खनिजांचे प्रतिब्रास बाजार मुल्यानुसार राँयल्टी प्रतिब्रास ५ हजार ८६९ रूपये प्रमाणे बाजारमुल्याच्या पाचपट मिळून दंडाची रक्कम १९ लाख १ हजार ६५७ रुपये दंडाच्या रक्कमेची नोटीस बजावली आहे.

टॅग्स :sandवाळूcollectorजिल्हाधिकारीSatara areaसातारा परिसर