त्यागाशिवाय काहीही साध्य होत नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST2021-02-06T05:12:59+5:302021-02-06T05:12:59+5:30
खोडजाईवाडी, ता. कऱ्हाड येथील साठवण तलावाच्या भूसंपादन निधीचे वितरण, विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन व मंत्री बाळासाहेब पाटील यांचा ...

त्यागाशिवाय काहीही साध्य होत नाही
खोडजाईवाडी, ता. कऱ्हाड येथील साठवण तलावाच्या भूसंपादन निधीचे वितरण, विविध विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटन व मंत्री बाळासाहेब पाटील यांचा जाहीर सत्कार अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सहकार व पणनमंत्री बाळासाहेब पाटील होते. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, अर्थ व शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, राष्ट्रवादीचे कऱ्हाड उत्तरचे अध्यक्ष देवराज पाटील, पंचायत समिती सभापती प्रणव ताटे, माजी सभापती शालन माळी, माजी विभागीय आयुक्त तानाजीराव साळुंखे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अजितराव पाटील-चिखलीकर आदींची प्रमुख उपस्थिती होती.
रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, खोडजाईवाडी ग्रामस्थांनी चांगले पैसे मिळाल्यावरही ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करून आदर्श घालून दिला आहे. शासनाने अशा आदर्शवत बिनविरोध ग्रामपंचायत निवडणूक करणाऱ्या गावांना प्रोत्साहनपर बक्षीस द्यावे.
यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, मंत्री बाळासाहेब पाटील, अजितराव पाटील, मानसिंगराव जगदाळे, संगीता साळुंखे, शहाजीराव क्षीरसागर, डॉ. विजय साळुंखे, बजरंग कोकाटे आदींची भाषणे झाली.
संभाजीराव मांडवे यांनी प्रास्ताविक केले. सुनील साळुंखे यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र मांडवे यांनी स्वागत केले. तर सागर गोडसे यांनी आभार मानले.
- चौकट
स्वागत आणि आनंदोत्सव...
तीन तालुक्याच्या हद्दीवर डोंगराच्या कुशीत वसलेल्या खोडजाईवाडी गावाची जमीन साठवण तलावासाठी अकरा वर्षांपूर्वी देण्यात आली होती. मात्र त्या जमिनीचा मोबदला मिळवून देण्यासाठी परिसरातील विविध मान्यवरांसह पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विशेष पाठपुरावा केला होता आज त्या निधीचे वितरण कार्यक्रम होत असल्याने ग्रामस्थांच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. त्यांनी गावात सडा रांगोळ्या गुढी उभारून हा आनंदोत्सव साजरा करत येणाऱ्या पाहुण्यांचे पारंपरिक पद्धतीने लेझीम व ढोलाच्या निनादात स्वागत केले.
फोटो : ०४केआरडी०२
कॅप्शन : खोडजाईवाडी, ता. कऱ्हाड येथील साठवण तलावाच्या भूसंपादन निधीच्या वितरणप्रसंगी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचे भाषण झाले.