शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

"तर मिशीच काय... भुवया पण काढून टाकेन..."; उदयनराजे भोसलेंनी दिलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 23:01 IST

"तुम्ही दिवस, वार, वेळ ठरवून समोरासमोर या"

सचिन काकडे, लोकमत न्यूज नेटवर्क, सातारा: ‘तुम्ही दिवस, वार, वेळ ठरवून समोरासमोर या. आम्ही भ्रष्टाचार कुठे अन् काय केला तो सांगा. एकाने जरी सांगितलं की उदयनराजेंनी भ्रष्टाचार केलाय, तर मी देवाची शप्पथ सांगतो, मिशाच काय भुवया देखील काढून टाकेन,’ अशा शब्दांत खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना आव्हान दिले.

सातारा विकास आघाडीच्या वतीने गुरुवारी सायंकाळी विविध विकासकामांचे उद्घाटन खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यावर जोरदार प्रहार केला. ते म्हणाले, "ज्यांची बौद्धिक पात्रता खुजी आहे, त्यांच्याकडून अपेक्षा काय करणार. त्यांच्याकडे टीका करण्यापलीकडे काहीच उरलेलं नाही. पालकमंत्री, आमदारकी,  नगरपालिका व अन्य संस्था अनेक वर्षे तुमच्या ताब्यात असताना विकासकामे का झाली नाहीत. तुम्हाला कोणी अडवलं होतं की तुमची इच्छाशक्ती नव्हती. मी तर म्हणेन तुमच्याच काळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला, त्यामुळे कामे रखडली."

"आम्हाला नावे ठेवा; पण तुम्ही सातारावासीयांसाठी काय केलं ते सांगा. मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगत आहे, तुम्ही एकदा समोरासमोर या. अगदी वेळ, वार, ठिकाणही तुम्हीच ठरवा. एकाने जरी सांगितलं की उदयनराजेंनी भ्रष्टाचार केलाय तर मी देवाची शप्पथ सांगतो, मिशाच काय भुवया देखील काढून टाकेन, पुन्हा आपलं तोंड दाखविणार नाही. लोकांची सेवा करण्याचा जो वसा आम्हाला मिळालाय तो आम्ही जपत आहे. उलट तुमच्याकडून घराण्याला अशोभनीय कार्य घडत आहे" असे ते म्हणाले.

"तुम्हाला जनमत अजमावयाचं आहे तर सातारा काय महाराष्ट्रात चला. यांना लोकांसाठी झिजनं काय असतं, हे माहीत आहे का? तुम्ही जर महान कार्य केलं तर निवडणुकीत सर्वसामान्य माणसापुढे का टिकू शकला नाही. लोकांचं हित हाच माझा स्वार्थ आहे. दुसऱ्याला कमी लेखून माणूस कधी मोठा होत नसतो. तो स्वत:च्या कर्तृत्वाने मोठा होतो. मला काय स्वत:चं पेटिंग काढण्याची हौस नाही. लोकं का पेटिंग काढतायत याचा कधी विचार केलाय का?" असा सवाल त्यांनी केला.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेSatara areaसातारा परिसरShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले