शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत केनियाचा खेळाडू आणि दोन प्रशिक्षकांवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला; भाजप म्हणतेय... 'कलंक'
2
आता मिसाइल, दारूगोळा अन् शस्त्रास्त्र खासगी कंपन्या बनवणार; संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय
3
अरबी समुद्रात 'शक्ती' चक्रीवादळ घोंगावलं, हवामान खात्याचा इशारा; महाराष्ट्राला कितपत बसणार फटका?
4
...म्हणून अजित पवारांनी त्या गोष्टीचा फायदा उचलला; गृहराज्यमंत्री योगेश कदम : आदित्यला मंत्रिपद ही चूक
5
चालतंय तोवर चालवायचं असं तो वागला नाही; मग तुम्ही एवढी घाई का केली? कैफचा आगरकरांना सवाल
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना चौफेर यश, येणी वसूल-पैशांचा ओघ; बढती-नवी नोकरी, सरकारी लाभ!
7
दहा मुलांचे जीव गेल्यानंतर 'अ‍ॅक्शन'! विषारी कफ सिरप लिहून देणाऱ्या 'त्या' डॉक्टरला बेड्या 
8
महायुतीत संघर्ष पेटला! गणेश नाईकांचे 'ते' व्हिडिओ महाराष्ट्रात प्रदर्शित करू; शिंदेसेनेचा इशारा
9
पुढच्या वर्षी मेगा सरकारी नोकरभरती, एमपीएससी भरतीही रेंगाळणार नाही; फडणवीस यांची घोषणा
10
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'बॉम्ब'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
11
फरहान अख्तरच्या ड्रायव्हरने ३५ लिटर क्षमतेच्या टाकीत ६२१ लिटर इंधन भरले; बिल दिले अन्...
12
आजचे राशीभविष्य- ५ ऑक्टोबर २०२५: शुभ फलदायी दिवस, नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल
13
शेतकऱ्यांना पावसाचा, नाेकरदारांना महागाईचा फटका; दिवाळीपूर्वी काय काय होऊ शकते...
14
कोजागरी पौर्णिमा केव्हा साजरी करायची? यंदा मध्यरात्रीच आली, पंचांगकर्ते दा. कृ. सोमण म्हणाले...
15
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
16
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
17
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
18
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
19
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
20
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश

अभी नहीं... मरने के बाद गाडी भेजेंगे! परप्रांतीयांनी व्यक्त केल्या वेदना...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 11:39 IST

ज्या घरामध्ये राहतो तेथील मालकाला घरभाडे द्यावे लागते, लहान मुले आणि कुटुंबाच्या अन्नपाण्याची व्यवस्था करावी लागते. अशा परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा गावाला जाणे कधीही चांगले नाही का? असा सवालच परप्रांतीय करत आहेत.

ठळक मुद्दे*जो लोग मर गये उनके लिए गाडी भेजी... जिंदा लोगों के लिए नहीं

दीपक शिंदे ।सातारा : गेल्या दोन महिन्यांपासून गावाकडे जायचे म्हणून अडकून पडलो आहोत. काम बंद असल्याने हातात पैसा नाही, घरातील साहित्य संपले, भीक तरी कशी मागायची, अशा परिस्थितीत गावाकडे जाण्यासाठी मेडिकल प्रमाणपत्र घेतले; पण वाहतूक पाससाठी गाडी नंबर मागितला जातो आहे. आमच्याकडे कुठे आहे गाडी. सरकारनेचे गाडीची व्यवस्था केली पाहिजे. पण, ते आता नाही, आम्ही मेल्यानंतर गाडीची व्यवस्था करतील, अशी आर्त वेदना परप्रांतीय नागरिक व्यक्त करत आहेत.

शहराच्या वेगवेगळ्या भागामध्ये फर्निचरचे काम करणारे, फरशी काम आणि बांधकामावर काम करणारे अनेक परप्रांतीय रोजगार नाही म्हणून घरी बसून आहेत. रोजगार नाही, पैसे नाहीत, घरातील साहित्य संपले. रोज किती दिवस दुसऱ्यांनी दिलेले जेवण करून दिवस काढायचे, असा प्रश्न त्यांना पडतो आहे. ज्या घरामध्ये राहतो तेथील मालकाला घरभाडे द्यावे लागते, लहान मुले आणि कुटुंबाच्या अन्नपाण्याची व्यवस्था करावी लागते. अशा परिस्थितीत खितपत पडण्यापेक्षा गावाला जाणे कधीही चांगले नाही का? असा सवालच परप्रांतीय करत आहेत.

रेड झोनमध्ये असल्यामुळे आरोग्य प्रमाणपत्र पाहिजे, यासाठी आम्ही दिवसभर रांगेत उभे राहून आरोग्य प्रमाणपत्र मिळविले. त्याच्यानंतर आता आॅनलाईन फॉर्म भरण्यासाठी सांगितला जात आहे. कामगार, अशिक्षित लोक कसा फॉर्म भरणार. त्यासाठी सरकारने व्यवस्था केली; पण त्या केंद्रावर गेल्यावर अर्ज भरताना गाडी नंबर मागितला जात आहे. ज्यांच्याकडे दुचाकी नाही ते चारचाकी गाडी कोठून आणणार. गावापर्यंत जायला आणि गाडीवाल्याला देण्यासाठी पैसे तरी पाहिजेत. त्यामुळे सरकारने सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था करण्याची गरज आहे.

पण सार्वजनिक वाहन व्यवस्था उपलब्ध नाही, असे सांगून वाहतूक परवानाच मिळत नाही. त्यामुळे कसे जाणार गावाला. जगलो, वाचलो तर परत येऊ. पण जगलोच नाही तर काय करणार. अनेकदा उपाशीपोटी झोपावे लागते.

अजून दोन दिवस वाट पाहणार...गावाकडे जाण्यासाठी काय व्यवस्था होते का? याबाबत अजून दोन दिवस सर्व परप्रांतीय वाट पाहणार आहेत. त्यानंतर जर कोणतीच व्यवस्था झाली नाही तर मग पायी जाण्याशिवाय पर्याय नाही. आतापर्यंत अनेकजण पायी गेले, भेटेल त्या गाडीने गेले. त्यामुळे आम्हीही तोच निर्णय घेण्याच्या मानसिक अवस्थेत आलो आहे.

*जो लोग मर गये उनके लिए गाडी भेजी... जिंदा लोगों के लिए नहींऔरंगाबादजवळील अपघाताचा आठवण करून देताना एक परप्रांतीय सांगू लागला. लोक जिवंत असताना त्यांना कोणीच विचारत नाहीत. मात्र, मेल्यानंतर गाडी पाठवितात. हीच व्यवस्था अगोदर केली असती तर एवढ्या लोकांना आपला जीव गमवावा लागला नसता.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस