सीबीएसई दहावीत यंदा एकही विद्यार्थी होणार नाही नापास, निर्णयाचे पालकांकडून स्वागत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:12 IST2021-02-06T05:12:19+5:302021-02-06T05:12:19+5:30
सातारा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ तत्त्व आणि कौशल्य विषय यंदाच्या परीक्षेपासून ...

सीबीएसई दहावीत यंदा एकही विद्यार्थी होणार नाही नापास, निर्णयाचे पालकांकडून स्वागत
सातारा : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ तत्त्व आणि कौशल्य विषय यंदाच्या परीक्षेपासून लागू केला आहे. त्यामुळे एखादा विद्यार्थी हा विज्ञान, गणित, समाजशास्त्र यापैकी एखाद्या विषयात नापास झाल्यास त्याला कौशल्य विषयातील गुणांमुळे पास होता येणार आहे. या निर्णयाचे सातारा जिल्ह्यातील पालकांनी स्वागत केले आहे.
‘बेस्ट ऑफ फाईव्ह’ तत्त्वाबरोबरच कौशल्य हा सहावा ऐच्छिक विषय लागू केला आहे. या विषयासाठी १७ उपविषय असून त्यामध्ये रिटेल, आयटी, सिक्युरिटी, अॅटोमोटिव्ह, फायनान्शियल मार्केट, टुरिझम, बँकिंग अँड इन्शुरन्स, हेल्थ केअर, आदींचा समावेश आहे. त्यापैकी एक विषय विद्यार्थ्यांना निवडता येणार आहे. सीबीएसईने वर्षभरापूर्वी ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’चा निर्णय घेतला. त्याची अंमलबजावणी यंदाच्या परीक्षेपासून होणार आहे.
चौकट
काय आहे नवीन नियम...
सीबीएसईसाठी इंग्रजी, हिंदी, विज्ञान, गणित आणि समाजशास्त्र हे पाच मुख्य विषय आहेत. त्याच्या जोडीला आता कौशल्य हा विषय देण्यात आला आहे. मुख्य विषयांमधील विज्ञान, गणित, समाजशास्त्र यापैकी एका विषयात विद्यार्थी नापास झाल्यास त्याला सहाव्या कौशल्य विषयातील गुण हे नापास झालेल्या विषयासाठी ग्राह्य धरून त्याला पास केले जाणार असल्याची माहिती पोदार इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य अरविंदकुमार सिंग यांनी दिली. औपचारिक शिक्षण आणि कौशल्य विषयाची सांगड घातल्याने विद्यार्थ्यांना करिअरच्यादृष्टीने फायदा होणार आहे. विद्यार्थ्यांचे मनोधैर्य, आत्मविश्वास वाढविण्यासाठी मोठी मदत होणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
प्रतिक्रिया
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्यादृष्टीने सीबीएसईने चांगला निर्णय घेतला आहे. विज्ञान, गणित विषयांबाबतचा त्यांचा तणाव कमी होण्यास मदत होईल.
- ज्योती दावडा ठक्कर, पालक, सदरबझार
सीबीएसईचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा आहे. नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना पास करण्यासाठी कौशल्य विषयाचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. ‘बेस्ट ऑफ फाईव्ह’मुळे गुणवत्ता, टक्केवारी वाढणार आहे.
- अर्चना जाधव, पालक, शाहुनगर
चांगला निर्णय आहे. गणित, विज्ञान, समाजशास्त्रपैकी एखाद्या विषयात पास होण्यास अडचण आल्यास या निर्णयामुळे त्याला मदत होईल. कौशल्य विकासाच्यादृष्टीने फायदा होणार आहे.
- रोहन जाधव, पालक,
जिल्ह्यातील आकडेवारी दृष्टिक्षेपात....
सीबीएसई दहावीच्या शाळा : ०००
विद्यार्थी संख्या : ००००