ग्रामपंचायत बिनविरोध निवडीशी कोणत्याही पक्षाचा संबंध नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:36 AM2021-01-21T04:36:09+5:302021-01-21T04:36:09+5:30

कोरेगाव : भाडळे खोऱ्यातील नागेवाडी, चिलेवाडी व होलेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक ही गावपातळीवर एकत्रितरीत्या येऊन बिनविरोध काढली आहे. या निवडणुकीशी ...

No party has anything to do with unopposed Gram Panchayat elections | ग्रामपंचायत बिनविरोध निवडीशी कोणत्याही पक्षाचा संबंध नाही

ग्रामपंचायत बिनविरोध निवडीशी कोणत्याही पक्षाचा संबंध नाही

Next

कोरेगाव : भाडळे खोऱ्यातील नागेवाडी, चिलेवाडी व होलेवाडी ग्रामपंचायतीची निवडणूक ही गावपातळीवर एकत्रितरीत्या येऊन बिनविरोध

काढली आहे. या निवडणुकीशी कोणत्याही पक्षाचा संबंध नाही, त्यामुळे

आमच्या गावाचा कोणीही उल्लेख करू नये, असे स्पष्टीकरण तिन्ही गावांतील

प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एका पत्रकाद्वारे दिले आहे.

नागेवाडी येथील नामदेव चव्हाण व सचिन चव्हाण, चिलेवाडी येथील सागर ढोले,

श्रीकांत फाळके आणि होलेवाडी येथील ललिता माने व रवींद्र माने या सहा जणांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकामध्ये म्हटले आहे की, ‘आम्ही गावातील

प्रमुख पदाधिकारी असून, सरपंचपद भूषविलेले आहोत. गेली दहा वर्षे आम्ही

आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहोत. स्थानिक

गावपातळीवर आम्ही गावाच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्रित येऊन बैठकांद्वारे ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणताही वाद न होता निवडणूक बिनविरोध होत असल्याने आमदार शशिकांत

शिंदे यांनी लक्ष घातले नाही, असेही पत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे या निवडणुकीशी कोणत्याही पक्षाचा संबंध नाही, त्यामुळे आमच्या

गावाचा कोणीही उल्लेख करू नये, असे पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

Web Title: No party has anything to do with unopposed Gram Panchayat elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.