शहरं
Join us  
Trending Stories
1
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
2
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
3
रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पीएम मोदींसोबतच्या बैठकीत पुतिन यांचे मोठे विधान, म्हणाले...
4
'या' ८ म्युच्युअल फंड्सनी दिले नेगेटिव्ह रिटर्न; 'या' क्षेत्रातील फंडांचा समावेश, कशी ओळखायची जोखीम?
5
अशीही आईची माया! जिच्या मुलीचा जीव घेतला, तीच आता 'सायको पूनम'च्या मुलाचा सांभाळ करणार
6
"मला खरंच वाटत नव्हतं.."; लग्न लांबणीवर पडल्यानंतर पहिल्यांदा स्मृती मंधानाची इन्स्टा पोस्ट
7
Flight Fare Hike: मुंबई-दिल्ली विमानाचे तिकीट झाले ५०-६० हजारांना; इंडिगोची विमाने रद्द, दुसऱ्या कंपन्यांनी लुटायला सुरुवात केली...
8
शत्रूच्या घरात घुसून हेरगिरी करण्याचे मिशन, रणवीर सिंहचा 'धुरंधर' नक्की कसा आहे? वाचा रिव्ह्यू
9
“महायुती सरकारने एका वर्षाच्या कामाची श्वेतपत्रिका काढावी”; विजय वडेट्टीवार यांची मागणी
10
आता 'झीरो बॅलन्स' खात्यातही मिळणार ATM, चेकबुकसह अनलिमिटेड सुविधा; RBI चे नवे नियम जाहीर
11
१०० वर्षांनी २ शत्रू ग्रहांचा समसप्तक योग: ७ राशींना लाभ, पद-पैसा-प्रतिष्ठा; मनासारखे घडेल!
12
'धुरंधर'च्या क्लायमॅक्सची चर्चा, आता दुसरा भागही येणार; रिलीज डेटची अधिकृत घोषणा
13
संकटादरम्यान IndiGo नं ग्राहकांची मागितली माफी; रिफंड आणि फ्लाइट रीशेड्युल वर केली मोठी घोषणा
14
लिओनेल मेस्सी फुटबॉल विश्वचषकापूर्वी निवृत्त होणार? दिग्गज फुटबॉलरच्या 'या' विधानाने खळबळ
15
इंडिगोला मोठा दिलासा! डीजीसीएने क्रू विश्रांतीचा नियम मागे घेतला, तरीही उड्डाणे सुरळीत होण्यासाठी काही दिवस लागणार
16
VIDEO : पांड्याचा स्वॅगच वेगळा! ज्यानं विकेट घेतली त्याच्या गळ्यात जाऊन पडला अन्...
17
नगरपालिकांची मतमोजणी २१ डिसेंबरलाच; सुप्रीम कोर्टाने हायकोर्टाचा निर्णय कायम ठेवला, पण...
18
'मिर्झापूर'मध्ये का काम केलंस? 'ॲनिमल'वर टीका करणाऱ्या अभिनेत्रीला नेटकऱ्यांचा थेट सवाल
19
थरार! गाझामध्ये हमासचा कर्दनकाळ ठरलेल्या यासर अबू शबाबला घरातच संपवले! भांडणं ठरलं मृत्यूचं कारण
20
IndiGo Flight Cancellations: लहान मुले-वृद्धांनी बेंचवर झोपून रात्र काढली; इंडिगो संकटामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल;..!
Daily Top 2Weekly Top 5

कितीही चौकशा लावा, घाबरत नाही; ...तर पुढील सरकारही महाआघाडीचेच - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 12:00 IST

पवार म्हणाले, सरकार हे आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल आणि सर्व जण एकत्रित लढले, तर पुढील सरकारही महाआघाडीचेच येईल.

सातारा : ज्या राज्यात भाजपचे सरकार नाही, त्या ठिकाणी ईडी, सीबीआय अशा वेगवेगळ्या केंद्रीय संस्थांच्या माध्यमातून चौकशा लावण्याचे प्रकार केंद्र सरकार करत असते. सत्तेचा दुरुपयोग करून स्थानिक सरकारचा उपमर्द करण्याचे काम ते नेहमी करतात; पण त्यांना किती चौकशा लावायच्या त्या लावू देत. त्यामुळे अशा चौकशांना आम्ही घाबरत नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपला दिला.महाबळेश्वर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रशिक्षण शिबिरासाठी आले असता, पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पवार म्हणाले, सरकार हे आपला पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण करेल आणि सर्व जण एकत्रित लढले, तर पुढील सरकारही महाआघाडीचेच येईल. सरकार स्थापन झाल्यानंतर दोन दिवसात, मग दोन महिन्यांत, नंतर एक वर्षात पडणार, असे भविष्य अनेक जण वर्तवीत होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलही अधूनमधून भविष्य वर्तवीत असतात. ते ज्योतिष पाहण्याच्या क्षेत्रात गेले तर चांगले होईल, असा टोलाही त्यांनी लगावला. यशवंतराव चव्हाण आणि  किसन वीर यांचा शिस्तीचा कित्ता लक्ष्मणराव पाटील यांनी सुरू ठेवला. त्यानंतर आता मकरंद पाटील यांनीही सुरू ठेवला आहे.

‘युवकांना संधी’ - राजकारणात संधी मिळत नसते, ती हिसकावून घ्यावी लागते. युवकांना निवडणुकीत संधी मिळाली पाहिजे, अशा त्यांच्या अपेक्षा असणे साहजिकच आहे. त्यामुळे या निवडणुकांना सामोरे जाण्यासाठी निवडणुका एकत्रित लढायच्या का, याबाबतही चर्चा करण्यात आली. त्याबाबतचे नियोजनही करण्यात आले. तसेच स्थानिक निवडणुकांमध्ये युवकांना संधी दिली जावी याबाबतही चर्चा करण्यात आल्याचे पवार यांनी सांगितले. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSatara areaसातारा परिसरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीNCPराष्ट्रवादी काँग्रेस