ना इंटरनेटला रेंज...ना आधुनिक मोबाइल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:19 AM2021-01-24T04:19:28+5:302021-01-24T04:19:28+5:30

सातारा : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक लढलेल्या सर्वच उमेदवारांनी ट्रू वोटर अ‍ॅप या अ‍ॅप्लिकेशनमध्ये खर्चाचा तपशील भरायचा आहे. ...

No internet range ... no modern mobile | ना इंटरनेटला रेंज...ना आधुनिक मोबाइल

ना इंटरनेटला रेंज...ना आधुनिक मोबाइल

Next

सातारा : राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणूक लढलेल्या सर्वच उमेदवारांनी ट्रू वोटर अ‍ॅप या अ‍ॅप्लिकेशनमध्ये खर्चाचा तपशील भरायचा आहे. मात्र, ना इंटरनेटला रेंज...ना आधुनिक मोबाइल अशा परिस्थितीत उमेदवारांची भलतीच कोंडी झालेली आहे.

जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायती या दुर्गम भागात आहेत. अनेक गावांमध्ये इंटरनेटची रेंज पोहोचलेली नाही. सातारा, जावली, महाबळेश्वर, पाटण, वाई या तालुक्यांच्या पश्चिम भागामध्ये इंटरनेट मिळत नसल्याने संबंधित परिसरातील नागरिकांकडे आधुनिक फोन नाहीत. तसेच बहुतांश गावांतील युवक हे नोकरी निमित्ताने सातारा, पुणे, कोल्हापूर, मुंबई या मोठ्या शहरांमध्ये राहतात. त्यांच्या पालकांकडे इंटरनेटची सोय नसलेले आणि केवळ कॉल करण्यापुरते वापरण्याजोगे फोन आहेत. त्यांनी आता निवडणूक खर्चाची तपशील कसा द्यायचा हा प्रश्न आहे.

दरम्यान, ट्रू वोटर अ‍ॅपवर खर्च भरणे बंधनकारक असले तरी निवडणूक आयोगाने ऑफलाइन खर्चाचा तपशील भरून घेण्याची सुविधा केलेली आहे. त्यामुळे उमेदवार निवडणूक आयोगाने दिलेल्या नमुन्यात प्रतिज्ञापत्र सादर करुन खर्चाचा तपशील देताना पहायला मिळत आहेत.

चौकट..

दैनंदिन खर्च देणे बंधनकारक

ग्रामपंचायत निवडणुकीतील सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने ट्रू वोटर अ‍ॅपचा वापर बंधनकारक केला आहे. सातारा जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये निवडणूक लढलेल्या सर्व उमेदवारांनी ग्रामंपचांयतीच्या निवडणुकांमध्ये केलेल्या दैनंदिन व एकूण खर्चाची तपशीलवार माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या या अ‍ॅपवर भरणे बंधनकारक आहे.

चौकट..

निवडणूक लढलेल्या सर्वांनाच गरजेचे

उमेदवारांनी गुगल प्ले स्टोअरमधून ट्रू वोटर अ‍ॅप डाऊनलोड करायचे आहे. निवडणुकीचा निकाल प्रसिद्ध झाल्यापासून ३0 दिवसांच्या आत एकत्रित खर्चाचा तपशील विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्रासह सादर करणे हेदेखील बंधनकारक आहे. विजयी, पराभूत आणि बिनविरोध उमेदवारांसाठीदेखील ही अट लागू आहे.

उमेदवारांना अनेक अडचणी

जिल्ह्यातील ११ तालुक्यांमधील ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक पार पडली आहे. यामध्ये पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली, सातारा या तालुक्यांतील डोंगरी व दुर्गम भागांतील ग्रामपंचायती मोठ्या प्रमाणात आहेत. त्या ठिकाणी इंटरनेट चालत नाही. त्यांना ट्रू वोटर अ‍ॅप घेताना व त्यात खर्च भरताना अडचणी येत आहेत.

कोट...

ऑफलाईन फॉर्म दिले आहेत. तेच भरून आम्ही निवडणूक विभागाकडे सादर करणार आहे. हे अ‍ॅप्लिकेशन वापरणे सक्तीचे केलेले नाही. मात्र वेळेमध्ये खर्च सादर करावा लागणार आहे.

- हणमंत कणसे

कोट..

इंटरनेट घेण्यासाठी आधुनिक मोबाइल लागतो. तो आमच्याकडे नाही. मुले नोकरीनिमित्त बाहेरगावी आहेत, त्यांच्याकडे फोन असले तरी त्यांचे काम सोडून आमच्या खर्चाचा ते तपशील ते ठेवू शकत नाहीत.

- जनार्दन जगदाळे

फोटो नेम :ऑनलाइन, २000

प्रूफला

Web Title: No internet range ... no modern mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.