शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाड विमानतळाचा विस्तार नाही, अजित पवारांनी मांडले रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 17:32 IST

कऱ्हाडच्या विमानतळ विस्तारीकरणात अनेक लोकांच्या सुपीक जमिनी जात आहेत. त्यामुळे कऱ्हाड विमानतळाचे होणारे विस्तारीकरण हे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरणार असल्याबाबत लोकमतने भूमिका मांडली होती.

प्रमोद सुकरेकऱ्हाड : कऱ्हाड विमानतळ विस्तारीकरणाची गरज आहे का? आम्ही पुण्यात विमानतळ विस्तारीकरण करायला लागलोय, त्याला निधी उभा करताना नाकीनऊ आले आहे. पुण्यात आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तरी आहे. कऱ्हाडला तशी परिस्थिती नाही. त्यामुळे हे सरकार आहे तोपर्यंत कऱ्हाडला विमानतळ विस्तारीकरण नाही, असे रोखठोक मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.उपमुख्यमंत्री अजित पवार कऱ्हाड दौऱ्यावर असताना विमानतळ विस्तारीकरण विरोधी कृती समितीने त्यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले. त्यावेळी पवार यांनी स्पष्टपणे आपले मत सांगितले. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, प्रशांत यादव, कृती समितीचे दाजी जमाले, पंजाबराव पाटील, रमेश लवटे, संभाजी साळवे, मोहम्मद आवटे उपस्थित होते.खरंतर दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीतून कऱ्हाडला विमानतळाची उभारणी झाली. पुढे दिवंगत डॉ. पतंगराव कदम उद्योगमंत्री असताना येथे नाईट लँडिंगची सुविधा करण्यात आली तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यावर त्याच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव पुढे आला. पण तो प्रस्ताव सुरुवातीपासूनच  वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.कऱ्हाड शहरालगतच्या गोटे, मुंढे व वारुंजी या गावातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांच्या कसदार जमिनी या प्रकल्पात जात आहेत. शिवाय शहरालगतच्या जमिनींना मोठा भाव आहे. तसेच भविष्याचा वेध घेता शेतकऱ्यांचा जमीन अधिग्रहणाला विरोध आहे. त्याचाच भाग म्हणून कृती समितीने रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन आपले गाऱ्हाणे मांडले. त्यावेळी अजित पवारांनी त्यांना दिलासा दिला. कऱ्हाडला विमानतळ विस्तार करण्याची गरज आहे का? असा उलट प्रश्न त्यानी केला.खरंतर आम्ही पुण्यात विमानतळ विस्तारीकरण करीत आहोत. तेथे त्याची गरज आहे. मात्र त्यालाही आमच्याकडे निधी अपुरा आहे. चाकण, पुणे येथे मोठी औद्योगिक वसाहत आहे. मोठमोठे उद्योगपती सकाळी विमानाने पुण्यात येऊन संध्याकाळी परत घरी जातात. तेथे आंतरराष्ट्रीय बाजारपेठ आहे. पण कऱ्हाडात अशी परिस्थिती नाही. त्यामुळे आमचा विस्तार करण्याचा विचार नाही, असे त्यांनी सांगून टाकले.

'लोकमत'ने यापूर्वीच मांडली होती स्पष्ट भूमिकाकऱ्हाडच्या विमानतळ विस्तारीकरणात अनेक लोकांच्या सुपीक जमिनी जात आहेत. त्यामुळे कऱ्हाड विमानतळाचे होणारे विस्तारीकरण हे शेतकऱ्यांसाठी अडचणीचे ठरणार असल्याबाबत लोकमतने भूमिका मांडली होती. याबाबत काही लोकांच्या प्रतिक्रियाही प्रसिद्ध केल्या होत्या. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याला दुजोरा देत कऱ्हाड विमानतळाचे विस्तारीकरण होणार नाही, अशी भूमिका घेतली आहे.

अनेकांनी मोबदला घेणे केले पसंतविमानतळ विस्तारीकरणात ज्यांच्या जमिनी अधिग्रहण केल्या जाणार आहेत त्यांना शासकीय दराच्या पाचपट मोबदला देण्यात येत आहे .बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांपैकी अनेक शेतकऱ्यांनी तो मोबदला घेणे पसंत केले असले तरी बरेच शेतकरी आपल्या विरोधावर आजही ठाम आहेत. त्याची प्रचिती रविवारीही आली.

कृती समितीची स्थापना

  • विमानतळ विस्तारीकरणाचा प्रस्ताव समोर आल्यानंतर स्थानिकांना याची झळ लक्षात आली.
  • कसदार जमिनी अधिग्रहण होऊ लागल्या. त्यामुळे बाधितांनी कृती समिती स्थापन करून लढा उभारला. सुरुवातीला या कृती समितीने विस्तारीकरणाला विरोध करीत भव्य मोर्चा काढला.
  • त्याची सांगता सभा कराडच्या लिबर्टी मैदानावर झाली होती. तेव्हा दिवंगत माजी मंत्री विलासराव पाटील -उंडाळकर व तत्कालीन आमदार बाळासाहेब पाटील यांनी सभेला उपस्थित राहून कृती समितीला पाठिंबा दिला होता.
टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडAirportविमानतळAjit Pawarअजित पवार