शहरं
Join us  
Trending Stories
1
सेनेगलमध्ये ८५ प्रवाशांनी भरलेले विमान धावपट्टीवरून घसरले, लागली आग; मोठी दुर्घटना टळली!
2
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
3
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
4
मुंबईची लोकसभा निवडणूक आता भारत-पाकिस्तान लढाई झालेली आहे; भाजपाचे मविआवर टीकास्त्र
5
स्ट्राइक रेटवरून विराट कोहलीची अप्रत्यक्षपणे पुन्हा गावस्करांना कोपरखळी, म्हणाला...  
6
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
7
विराट कोहलीला शतकाची हुलकावणी, पण RCB ची आतषबाजी; PBKS समोर २४२ धावांचे लक्ष्य
8
यशाची गॅरंटी; 'पुष्य नक्षत्र' असेल PM मोदींसाठी खास, 'या' दिवशी उमेदवारी अर्ज भरणार...
9
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
10
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
11
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
12
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
13
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
14
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
15
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
16
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
17
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
18
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
19
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
20
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली

अखेर ठरलं : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2021 12:02 PM

जिल्हा बँकेमध्ये सध्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे संख्याबळ असल्याने त्यांनी अध्यक्षपदावर दावा केला होता. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देखील घेतली होती.

सातारा :  जिल्हा मध्यवर्ती बँकेचीनिवडणूक झाली असली तरी अध्यक्ष निवडीवरून रस्सीखेच सुरु होती. जिल्हा बँकेमध्ये सध्या आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे संख्याबळ असल्याने त्यांनी अध्यक्षपदावर दावा केला होता. यासाठी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे या निवडीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. अखेर यावर तोडगा निघाला.जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी नितीन पाटील तर उपाध्यक्षपदी अनिल देसाई यांची वर्णी लागणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीच नितीन पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले.सहकार पॅनेलच्या छत्राखाली विविध पक्षांनी एकत्रित निवडणूक लढली. मात्र, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील साताऱ्यात येऊन गेल्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजप कार्यकर्त्यांमधील राजकारण तापले होते. यात आमदार शशिकांत शिंदे यांचा या निवडणुकीत अवघ्या एका मतांनी धक्कादायक पराभव झाला होता. यामुळे जिल्हा बँकेतील राजकारण चांगलेच तापले होते. अध्यक्षपदाच्या निवडीवरुन गेल्या चार-पाच दिवसांपासून उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. या सर्व चर्चेना अखेर पुर्ण विराम मिळाला.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरbankबँकElectionनिवडणूकSharad Pawarशरद पवारShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले