म्हसवड नगराध्यक्षपदी नितीन दोशी

By Admin | Updated: April 2, 2016 00:02 IST2016-04-01T23:19:35+5:302016-04-02T00:02:50+5:30

स्वीकृत निवडी बिनविरोध : जवाहर देशमाने, संजय सोनवणेंना संधी

Nitin Doshi as president of Mhaswad Municipal Corporation | म्हसवड नगराध्यक्षपदी नितीन दोशी

म्हसवड नगराध्यक्षपदी नितीन दोशी

म्हसवड : म्हसवडच्या नूतन नगराध्यक्षपदी नितीन दोशी तर स्वीकृत सदस्यपदी जवाहर देशमाने, संजय सोनवणे यांच्या बिनविरोध निवडी करण्यात आल्या.
नगराध्यक्ष निवड व स्वीकृत सदस्य निवडीचा कार्यक्रम शुक्रवारी झाला. निवडणूक निर्णय अधिकारी प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी काम पाहिले. यावेळी मुख्याधिकारी पल्लवी पाटील-भोरे, सोनिया गोरे , पंचायत समितीचे उपसभापती अतुल जाधव, संजय गांधी, गटनेते विजय सिन्हा, पक्षप्रतोद विजय धट, उपनगराध्यक्ष डॉ. वसंत मासाळ, नगरसेवक सुरेश म्हेत्रे यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
पालिकेत माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसची सत्ता आहे. सत्तेत सर्वांना समान संधी दिल्यामुळेच दुसऱ्या टप्प्यातील नगराध्यक्षपदाचे सर्वसाधारण प्रवर्गासाठी नगराध्यक्षपद आरक्षित असतानाही ओबीसी प्रवर्गातील विजय सिन्हा, सुरेश म्हेत्रे व विजय धट यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळाली. आता नगराध्यक्षपदी नितीन दोशी यांना संधी देण्यात आली आहे.
दोन-तीन महिन्यांपासून नगराध्यक्ष बदलाच्या विषय शहारात चर्चेत जात होता. परंतु, नगराध्यक्ष पदाच्या निवडीने या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.
नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने प्रलंबित शहरविकासाच्या विकासकामांना गती देऊन नागरिकांच्या मूलभूत सुविधांचे प्रश्न तत्परतेने सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे नितीन दोशी यांनी निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. (प्रतिनिधी)

जैन समाजाला ७५ वर्षांनंतर संधी
१९४० ते १९४५ या काळात जैन समाजातील माणिकचंद शेठजी दोशी यांनी नगराध्यक्ष पद भूषवले होते. त्यानंतर तब्बल ७५ वर्षांनी आमदार जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून या समाजातील नितीन दोशी यांना म्हसवड नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद मिळाल्याने जैन समाजात आनंदाचे वातावरण आहे.
निवडीनंतर गुलाल विरहित मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीस सुरुवात पालिकेपासून महात्मा फुले चौक, बसस्थानक चौक, मार्ग मुख्य पेठेतून काढण्यात आली.

Web Title: Nitin Doshi as president of Mhaswad Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.