शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

नऊ वर्षांत सातारा जिल्ह्यामधील १,१८१ शेतकरी कुटुंबीयांना सावरले अपघात विम्याने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2018 00:03 IST

सातारा : राज्यात सुरू करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत गेल्या नऊ वर्षांत सातारा जिल्ह्यातील शेतकरी अपघाताचे ११८१ विमा प्रस्ताव मंजूर झाले

ठळक मुद्देनुकसान भरपाई : १८९ प्रस्ताव नामंजूर; गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, वयाची अट १० ते ७५, ८८ प्रस्ताव अद्याप प्रलंबित

नितीन काळेल ।सातारा : राज्यात सुरू करण्यात आलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत गेल्या नऊ वर्षांत सातारा जिल्ह्यातील शेतकरी अपघाताचे ११८१ विमा प्रस्ताव मंजूर झाले असून, १८९ नामंजूर झाले आहेत. विम्यापोटी मिळणारी रक्कम संबंधित शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात आली आहे.दरवर्षी राज्यात विविध अपघातात शेतकऱ्यांचा मृत्यू होतो किंवा त्यांना अपंगत्व येते. घरातील कर्त्या व्यक्तीचा असा अनैसर्गिक मृत्यू झाल्यामुळे त्या कुटुंबास हलाखीच्या परिस्थितीला तोंड द्यावे लागते. शासन अशा शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबीयांना मदत करते; पण अशा शेतकºयांसाठी कोणतेही विमा संरक्षण नव्हते. यासाठी राज्य सरकारने गेल्या काही वर्षांपूर्वी शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली होती. त्यानंतर या योजनेचे नाव बदलण्यात येऊन गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, असे ठेवण्यात आले.एखाद्या अपघातात शेतकºयाचा मृत्यू झाल्यास विमा कंपनीच्या प्रस्तावानुसार दोन लाख रुपये कुटुंबीयांना मिळतात. तर अपंगत्व आल्यास एक लाख रुपयांची मदत दिली जाते. मात्र, ही मदत देण्यात येणारे शेतकरी हे त्यांच्या नावे सातबारा उतारा असणारे आवश्यक आहेत. तसेच संबंधित शेतकºयांचे वय १० ते ७५ असावे, शेतकºयाला मृत्यू, अपंगत्व हे अपघातानेच येणे आवश्यक असावे व तो शेतकरी वाहन चालवित असल्यास परवाना आवश्यक असतो. तसेच रस्ता, रेल्वे अपघात, पाण्यात बुडून मृत्यू, जंतूनाशक किंवा अन्य कारणाने विषबाधा, विजेचा धक्का, वीज पडून मृत्यू, खून, उंचावरून पडून मृत्यू, सर्पदंश, विंचूदंश, नक्षलवाद्याकडून झालेली हत्या, जनावरांच्या चावण्यामुळे मृत्यू आदींसाठी हा लाभ मिळतो.सातारा जिल्ह्यात गेल्या नऊ वर्षांत एकूण १४५८ प्रस्ताव हे अपघात विम्यासाठी कृषी विभागाकडे आले होते. ते सर्व प्रस्ताव विमा कंपनीकडे पाठविण्यात आलेले. त्यापैकी ११८१ प्रस्ताव मंजूर झाले तर नामंजूर प्रस्तावांची संख्या १८९ राहिली. तर ८८ प्रस्ताव अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत. जे प्रस्ताव नामंजूर झाले होते, त्यातील २३ हे मंजुरीस योग्य ठरले आहेत. तर मंजुरीस पात्रपैकी १४ प्रस्ताव हे न्यायालयात दाखल केले आहेत.अपघात लाभाचे स्वरूपअपघाती मृत्यू - दोन लाख रुपयेअपघातामुळे दोन डोळे निकामी होणे - दोन लाख रुपयेदोन अवयव निकामी होणे - दोन लाख रुपयेएक डोळा निकामी होणे - एक लाख रुपयेएक डोळा व एक अवयव निकामी होणे - दोन लाखएक अवयव निकामी होणे - एक लाख रुपये

टॅग्स :Satara areaसातारा परिसरDeathमृत्यू