नऊ हजार ‘पॉझिटिव्ह’; पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:39 IST2021-05-19T04:39:40+5:302021-05-19T04:39:40+5:30
संजय पाटील कऱ्हाड : कोरोना संसर्गाचा फेब्रुवारीपासून वाढलेला वेग अद्यापही कमी झालेला नाही. गत साडेचार महिन्यात तालुक्यात सुमारे नऊ ...

नऊ हजार ‘पॉझिटिव्ह’; पण
संजय पाटील
कऱ्हाड : कोरोना संसर्गाचा फेब्रुवारीपासून वाढलेला वेग अद्यापही कमी झालेला नाही. गत साडेचार महिन्यात तालुक्यात सुमारे नऊ हजार व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली. मात्र, त्यापैकी तब्बल ६ हजार ७०० पेक्षा जास्त रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत केवळ दहा टक्केच बाधित उपचारात आहेत.
कोरोना संक्रमण वाढले असून गावोगावी दररोज रुग्ण आढळताहेत. काही गावांमध्ये रुग्णांची साखळी निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत आरोग्य विभाग संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी हरतऱ्हेने प्रयत्न करीत आहे. रुग्णांवर उपचार सुरू करण्यापासून ते त्यांच्या निकट सहवासातील व्यक्तींच्या चाचण्या करण्यावरही भर दिला जात आहे. त्यासाठी आरोग्य विभागाला अविरत काम करावे लागत असून एकीकडे बाधित वाढत असताना दुसरीकडे कोरोनामुक्त रुग्णांचा आकडाही वाढत असल्यामुळे दिलासा मिळत आहे.
कऱ्हाड तालुक्यात लसीच्या पुरवठ्यानुसार लसीकरणही वेगाने केले जात आहे. उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रासह गावोगावी शिबिरांचे आयोजन करून लसीकरणाला गती दिली जात आहे. त्यामुळे संक्रमण रोखण्यासही मदत होत आहे. कोरोनामुक्तीचा वाढता टक्का आणि लसीकरणाने घेतलेला वेग यामुळे काही दिवसातच संक्रमणाची साखळी तोडण्यात यश येईल, अशी आरोग्य विभागाला अपेक्षा आहे.
- चौकट
६ हजार ४४६ रुग्ण घरीच झाले बरे
संक्रमण वाढल्यामुळे अनेकवेळा रुग्णालयांमध्ये बेड उपलब्ध होत नाहीत. परिणामी, सौम्य लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर घरीच उपचार करण्यावर आरोग्य विभागाकडून भर देण्यात येतो. त्यानुसार मार्च २०२० पासून आजअखेर शेकडो रुग्णांवर घरीच उपचार करण्यात आले. त्यापैकी ६ हजार ४४६ रुग्ण घरीच कोरोनामुक्त झाले आहेत.
- चौकट
जानेवारी ते आजअखेर
एकूण बाधित : ८९०६
कोरोनामुक्त : ६७७८
दुर्दैवी मृत्यू : ११४
उपचारात : २०१४
- चौकट
मार्च २०२० ते आजअखेर
एकूण बाधित : ८९०६
कोरोनामुक्त : ६७७८
दुर्दैवी मृत्यू : ११४
उपचारात : २०१४
- चौकट
सद्यस्थितीत सरासरी
अॅक्टिव्ह रेट : ९.६२%
मृत्यूदर : २.४२%
कोरोनामुक्ती : ८७.९६%
- चौकट
- चौकट
अॅक्टिव्ह रुग्ण
कृष्णा : २८४
सह्याद्री : ४४
कॉटेज : ३८
मिरज : १
सातारा : ४
पार्ले, सह्याद्री : १३०
एरम : १७
श्री : १३
कऱ्हाड हॉ. : २१
घरी : १४६६
लोगो : पॉझिटिव्ह स्टोरी