निमा प्रदर्शनाचा समारोप

By Admin | Updated: May 31, 2016 22:51 IST2016-05-31T22:40:33+5:302016-05-31T22:51:25+5:30

निमा प्रदर्शनाचा समारोप

NIMA exhibition concludes | निमा प्रदर्शनाचा समारोप

निमा प्रदर्शनाचा समारोप

 सातपूर : इलेक्ट्रिकल उद्योगात नाशिक आघाडीवर आहे. सीपीआरआय लॅबमुळे नाशिक इलेक्ट्रिकल उद्योगाची राजधानी होऊ शकेल एवढी नाशिकची क्षमता असल्याचे प्रतिपादन विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी केले. ते निमा पॉवर प्रदर्शनाच्या समारोपप्रसंगी बोलत होते.
यावेळी एचएएलचे ए. बी. घरड, एबीबीचे अजय गोसावी, इप्कॉसचे दीपक सावंत, शिवानंदानी कंपनीचे किशोर पगार, मंत्राज ग्रुपचे कुमार भागचंदानी, अमित चौरसिया, निशिकांत अहिरे, विरल ठक्कर आदि व्यासपीठावर उपस्थित होते. निमाचे अध्यक्ष संजीव नारंग यांनी स्वागत केले. प्रदर्शन समितीचे अध्यक्ष मिलिंद राजपूत यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन व्हीनस वाणी यांनी केले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते उत्कृष्ट स्टॉलधारकांना स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी धनंजय बेळे, किरण खाबिया, आशिष नहार, एस. के. नायर, सतीश कोठारी, सुधाकर देशमुख, संजय सोनवणे, संदीप भदाणे, शैलेश नारखेडे आदिंसह उद्योजक, स्टॉलधारक उपस्थित होते.
महाराष्ट्र पोलीस अकादमी समोरील ठक्कर डोम येथे दि. २७ ते ३० मे दरम्यान निमा पॉवर २०१६ या इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनात १०० पेक्षा अधिक स्टॉल्सची नोंदणी पूर्ण झाली होती. या प्रदर्शनात इरडा, एलका, तृप्ती आटोमेशन, हुपेन फेब्रिकेशन, गोगटे इलेक्ट्रॉसिस्टीम्स, ऋषभ इन्स्ट्रुमेंट, ओमेगा रोलिंग, इलेंक्ट्रो क्रिम्प, जाधव पॉवरटेक, बेदमुथा, नीलराज, युनिकोस सिस्टीम्स, विश्वजित, टाटा पॉवर सोलर, सत्यम आटोमेशन, सूर्या ग्रुप आदिंसह लघु आणि मध्यम व मोठे उद्योग सहभागी झाले होते. या प्रदर्शनात ‘इलेक्ट्रीफायिंग द फ्यूचर’ या संकल्पनेंतर्गत बी टू बी सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)‘

Web Title: NIMA exhibition concludes