सखीमंचचे नववर्षात दिखामदार पदार्पण
By Admin | Updated: January 15, 2015 23:32 IST2015-01-15T21:34:27+5:302015-01-15T23:32:44+5:30
१ फेब्रुवारीला एकदिवसीय सदस्य नोंदणी : लाभ घेण्याचे आवाहन

सखीमंचचे नववर्षात दिखामदार पदार्पण
सातारा : गेली अनेक वर्षे सखींच्या अंत:करणाशी जोडल्या गेलेल्या ‘लोकमत’ सखी मंचचे नववर्षात दिमाखदार पदार्पण होत असून २०१५ ची सदस्य नोंदणी १ फे्रबुवारीला होणार आहे. नोंदणी केवळ एक दिवसच चालणार आहे.तब्बल तेरा वर्षांची यशस्वी कारकिर्द असणारे सखी मंच म्हणजे असंख्य सखींनी मिळविलेले एक मुक्त आकाश, जिथं प्रत्येक सखीने अनुभवले आहेत अनेक अविस्मरणीय क्षण. उलगडले आहेत आपल्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू अन् वाढविला आहे स्वत:चा आत्मविश्वास. गेल्या तेरा वर्षात सखी मंचच्या सर्वच सोहळ्यात सातत्याने सहभागीच नव्हे तर अग्रभागी असणाऱ्या सख्यांची यावर्षातली प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच म्हणजे १ फेब्रुवारीला सखी मंच २०१५ ची एकदिवसीय सदस्य नोंदणी होणार आहे. सातारा शहरात अनंत इंग्लिश स्कूल (राजवाड्याजवळ), जिजामाता माध्यमिक विद्यालय (कर्मवीर समाधी परिसर, पोवई नाका) आणि अण्णासाहेब कल्याणी विद्यालय (जिल्हा परिषदेजवळ) या तीन ठिकाणी एकाच वेळी सखी मंचची सदस्य नोंदणी होणार आहे. सदस्यांना लकी ड्रॉमधून १८५०० रुपयांची आटाचक्की अनंत ट्रेडिंग कंपनीमार्फत, माऊली सोफाज मार्फत २१००० हजार रुपये किंमीचा आकर्षक सोफासेट जिंकण्याची संधीही मिळणार आहे. सोबतच प्रत्येक सखीला सुमुखी ब्युटी पार्लरमार्फत २५० रुपयांचे फेस क्लिनअप पूर्णपणे मोफत मिळणार आहे. प्रत्येक महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमात देखील बक्षिसांची लयलूट होणार असून तीन भाग्यवान सखींना कास हॉलीडे रिसॉर्टमध्ये कुटुुंबातील तीन व्यक्तींसह एक दिवस मोफत राहता येणार आहे. याअंतर्गत ७००० किंमतीच्या सुविधा (चहा, नाष्टा, जेवण, राहणे) सखीला मोफत मिळणार आहे. तसेच तीन भाग्यवान सखींना सातारा शहरानजिक असणाऱ्या बोरगाव येथील आनंद कृषी पर्यटन केंद्रामध्ये एक दिवसांचे पॅकेज, एन्ट्री फी, चहा, नाष्टा, जेवण यासह मोफत मिळणार तर आहेच शिवाय प्रत्येक सदस्याला तिच्या कुटुंबियांसह प्रत्येकी ५०/- रुपयांची सवलत दिली जाणार आहे. भाग्यवान सखींनी एस. एस. एंटर प्रायजेसमार्फत दोन इलेक्ट्रॉनिक्स इस्त्री जिंकता येणार आहेत आणि दहा भाग्यवान सखींना हॉटेल सुर्वेजमार्फत २०० रुपयांचे मोफत लंच किंवा डिनर मिळणार आहे. तसेच वर्षभर होणाऱ्या बिलावर १०% सवलतही मिळणार आहे. या बक्षिसांसोबत नेहमीप्रमाणेच हळदी-कुंकवाचे वाणदेखील जिजाऊ प्रतिष्ठानमार्फत प्रत्येक सभासदाला मिळणार आहे. (प्रतिनिधी)