शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नवीन महाबळेश्वर पर्यावरणावरील कृत्रिम संकट, पर्यावरणवादी शिवाजी राऊत यांनी व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 13:24 IST

चार तालुक्यांतील २३५ गावांतील अनेक कुटुंबांचे लक्ष

सातारा : धरणातील जलसाठ्यातील मृदूसंधारणाचा साठा अद्यापही कोणी तपासला नाही. त्यामुळे एकूण जल पर्यटन, निसर्ग पर्यटन वन्यजीव पर्यटन यासाठी आखण्यात आलेला हा अघोरी प्रकल्प भूमिपुत्रांना उद्ध्वस्त करणारा आहे. स्थानिकांच्या डोक्यावर बसवलेला नवीन महाबळेश्वर हा प्रकल्प पर्यावरणावरील कृत्रिम संकट ठरेल अशी भीती पर्यावरणवादी शिवाजी राऊत यांनी सहा सदस्यीय समितीपुढे व्यक्त केली.नवीन महाबळेश्वर प्रारूप विकास योजनेबद्दल प्राप्त झालेल्या हरकतींवर तापोळा, मेढा, पाटण व सातारा येथे सहा सदस्य समितीच्या समोर हरकतीच्या सुनावण्या पार पडल्या. सुमारे २०० नागरिक व ग्रामपंचायती यांनी मिळून नवीन महाबळेश्वरच्या प्रारूप आराखड्यास विरोध दर्शवला असून, ग्राम अनेक ग्रामपंचायतीने आपल्या हरकती व ठराव लेखी स्वरूपात समिती सादर केले आहेत.महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ मर्यादित यांच्या वतीने दि. १० ऑक्टोबर २४ रोजी राज्य शासनाने असाधारण राजपत्रानुसार नागरिकांना सूचना आणि हरकती घेण्याबाबत संधी दिली होती. दि. ३ ते ८ मार्चदरम्यान वरील चार ठिकाणी सुनावणी घेण्यात आली. या नवीन महाबळेश्वर प्रकल्पांतर्गत भूमिपुत्रांनाच प्राधान्य द्यावे. जमीन खरेदी व जमीन फसवणूक व जमिनीचा वाणिज्य वापर याबद्दल महाबळेश्वर, जावली, सातारा, पाटण या तालुक्यांतील भूमिपुत्रांना विश्वासात घेऊन मगच हा प्रकल्प माथे मारावा, असे राऊत यांनी आपले निवेदनात सांगितले आहे.

रांगेने उभे राहून नोंदविल्या हरकतीसातारा तालुक्यातील ८८ व्यक्तींच्या हरकती घेण्यात आल्या. लोकप्रतिनिधी शिवाय शासन समितीच्या पुढे सुनावणी झाल्यामुळे या सुनावणीत नागरिकांनी आपली तक्रारी रास्त पद्धतीने कथन केल्यावर समितीने त्याबाबत नोंद घेतली. रस्ते विकास महामंडळाच्या अनेक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत पंचायत समितीच्या अपुऱ्या जागेत रांगेने उभे राहून नागरिकांनी भूमिपुत्रांनी आपल्या हरकती लेखी स्वरूपात व तोंडी स्वरूपात कथन केल्या.तालुक्यातील २३५ गावांचे लक्षनवीन महाबळेश्वर पर्यावरणाचा नाश भूमिपुत्रांचा विनाश असं होणार की काय याकडे चार तालुक्यांतील २३५ गावांतील अनेक कुटुंबांचे लक्ष लागले आहे. भयग्रस्त सरपंच महिला हा प्रकल्प होऊ नये म्हणून जीवाच्या आकांताने लेखी निवेदन देताना दिसल्या. आपण कितीही कागदे पुढे सरकवली तरीही यातून काही फलस्वरूपात निष्पन्न होइल का, अशी भीतीही येथे येणाऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होती.

माधव गाडगीळ समितीचा पश्चिम घाट पर्यावरण अहवाल केंद्र व राज्य सरकारने स्वीकारला का नाकारला याबद्दल माहिती नाही. आंतरराष्ट्रीय पर्यावरणवादी संघटनांनी व कोप २२ च्या अहवालात आशियाई खंडातील भारतातील पश्चिम घाट हा अती संवेदनशील आहे. येथे जैवविविधता भुस्तर हालचाली मोठ्या प्रमाणात होत आहेत. कोयना हे ११० टीएमसीचे १९६० मेगावॉट वीज तयार करणारे धरण या नवीन महाबळेश्वर प्रकल्पामुळे याला बाधा पोहोचणार आहे. - शिवाजी राऊत, पर्यावरणवादी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानenvironmentपर्यावरण