कचऱ्यातल्या आयुष्याला मिळाली नवी ओळख...

By Admin | Updated: April 22, 2016 01:02 IST2016-04-21T22:37:29+5:302016-04-22T01:02:33+5:30

सयाजी शिंदे म्हणतात... डोक्यातला कचरा रस्त्यावर येतो! गुड न्यूज

A new introduction to trash life ... | कचऱ्यातल्या आयुष्याला मिळाली नवी ओळख...

कचऱ्यातल्या आयुष्याला मिळाली नवी ओळख...



सातारा : कचरा वेचणाऱ्यांना ‘कचरावेचक’ न म्हणता ‘स्वच्छतादूत’ म्हणावे, असे आवाहन अभिनेते सयाजी शिंदे यांनी केले. ‘कचरा डोक्यात असतो; मग तो रस्त्यावर येतो,’ अशा शब्दांत त्यांनी रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना फटकारले.
सर्व कचरा वेचक श्रमिक संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात स्वच्छतादूतांना आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने सयाजी शिंदे यांच्या हस्ते गणवेश वाटप करण्यात आले. आस्था सामाजिक संस्थेचे विजयकुमार निंबाळकर यावेळी उपस्थित होते.
स्वच्छतादूतांना व्यसनांपासून दूर राहण्याचा संदेश देऊन सयाजी शिंदे म्हणाले, ‘या दूतांना गणवेश वाटप करताना मला आनंद होत आहे. आरोग्य, स्वच्छता आणि मुलांचे शिक्षण या तीन गोष्टींना आयुष्यात महत्त्व देणे आवश्यक आहे. ज्या गोष्टींना महत्त्व द्यायला हवे त्या उपेक्षित राहणे योग्य नव्हे.’
स्वच्छतादूतांना ओळखपत्रे देऊन त्यांची शहरातील विविध प्रभागांत नेमणूक झाली तर घनकचऱ्याचे नियोजन करण्यास मोठा हातभार लागेल, असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी शिवाजी पवार, विजय मांडके, सचिन चंदने, जयंत ठाकूर, प्रेमराज शिंदे, मिनाज सय्यद, स्वप्नील ढाणे, सुनील उबाळे, सुनील भोसले, मंगेश लावंड, जनार्दन निपाणे, अमित
तपासे, विनय रावखंडे, आस्था सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सर्व कचरावेचक श्रमिक संघाचे आशिष सोनावणे यांनी सूत्रसंचालन केले. प्रकाश भिसे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: A new introduction to trash life ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.