दिवशी बुद्रुक ग्रामपंचायतीत बिनविरोधचा नवा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:05 IST2021-01-08T06:05:00+5:302021-01-08T06:05:00+5:30

दिवशी बुद्रुक ग्रामपंचायतीत विजयकुमार सूर्यवंशी, सचिनकुमार गुरव, बाळासाहेब डोंगरे, रघुनाथ महापुरे, राजश्री जाधव, सुषमा सूर्यवंशी, अंकिता सूर्यवंशी, राजश्री थोरात, ...

New history of unopposed in Budruk Gram Panchayat on the day | दिवशी बुद्रुक ग्रामपंचायतीत बिनविरोधचा नवा इतिहास

दिवशी बुद्रुक ग्रामपंचायतीत बिनविरोधचा नवा इतिहास

दिवशी बुद्रुक ग्रामपंचायतीत विजयकुमार सूर्यवंशी, सचिनकुमार गुरव, बाळासाहेब डोंगरे, रघुनाथ महापुरे, राजश्री जाधव, सुषमा सूर्यवंशी, अंकिता सूर्यवंशी, राजश्री थोरात, सुवर्णा सूर्यवंशी यांची बिनविरोध निवड करण्यात आली. राजकीयदृष्ट्या ही ग्रामपंचायत संवेदनशील मानली जाते. गावात विकासात्मक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून राजकारणाच्या पलीकडे जाऊन सार्वत्रिक विकासासाठी एकत्रित येण्याचे आवाहन कामगार नेते सुजित पाटील यांनी केले होते. ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या त्यांच्या आवाहनाला युवकांसह ज्येष्ठांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. आता या नवनिर्वाचित सदस्यांनी गावाचा सर्वांगीण विकास डोळ्यासमोर ठेवूनच आगामी पाच वर्षांत सकारात्मक काम करावे, असे आवाहन सुजित पाटील यांनी केले आहे.

निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पाडण्यासाठी सुजित पाटील, आबासाहेब सूर्यवंशी, वसंतराव डोंगरे, दादा जाधव, आनंदराव शेवाळे, संजय थोरात, बाळासाहेब सूर्यवंशी, शंकर नांगरे, जे. बी. सूर्यवंशी, उत्तमराव गुरव, डी. सी. पाटणकर, विजीत पाटणकर आदींनी परिश्रम घेतले.

फोटो : ०७केआरडी०१

कॅप्शन : दिवशी बुद्रुक, ता. पाटण येथील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.

Web Title: New history of unopposed in Budruk Gram Panchayat on the day