युवा महोत्सव वक्तृत्व स्पर्धेत नेहा देवगुडे प्रथम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:02 IST2021-01-08T06:02:40+5:302021-01-08T06:02:40+5:30

परळी : क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद सातारा आयोजित कोल्हापूर विभागीय युवा ...

Neha Devgude first in Youth Festival Eloquence Competition | युवा महोत्सव वक्तृत्व स्पर्धेत नेहा देवगुडे प्रथम

युवा महोत्सव वक्तृत्व स्पर्धेत नेहा देवगुडे प्रथम

परळी : क्रीडा व युवा सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे व जिल्हा क्रीडा परिषद सातारा आयोजित कोल्हापूर विभागीय युवा महोत्सवाचे आयोजन कोविड -१९ च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुल सातारा येथे करण्यात आले होते. यामधे कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली येथून गायन, वादन, वक्तृत्व, नृत्य अशा विविध कलेच्या सादरीकरणासाठी स्पर्धक ऑनलाईन च्या माध्यमातून सहभागी झाले होते.

या कोल्हापूर विभागीय युवा महोत्सवाच्या वक्तृत्व स्पर्धेत अंबवडे बुद्रुक गावची कन्या श्री समर्थ सेवा तरुण मंडळ अंबवडे बुद्रुकची सदस्या नेहा राजेंद्र देवगुडे हिने प्रथम क्रमांक मिळविला असून, तिची पुढील मुंबई येथे होणाऱ्या ऑनलाईन वक्तृत्व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तिला या स्पर्धेसाठी आर. वाय. जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तिचे ग्रामपंचायत अंबवडे बुद्रुक तर्फे कौतुक करण्यात आले.

Web Title: Neha Devgude first in Youth Festival Eloquence Competition