नकारात्मक गुणपद्धतीचा आयटीआय विद्यार्थ्यांना फटका
By Admin | Updated: December 9, 2014 23:18 IST2014-12-09T21:39:07+5:302014-12-09T23:18:59+5:30
स्टुंडस फेडरेशन आॅफ इंडियातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

नकारात्मक गुणपद्धतीचा आयटीआय विद्यार्थ्यांना फटका
सातारा : आयटीआय परीक्षेमध्ये नकारात्मक गुणांचे नवीन धोरण आखल्याने राज्यातील ८0 टक्के विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला असून त्यांचे भवितव्य धोक्यात आले आहे. या निर्णयाविरोधात स्टुंडस फेडरेशन आॅफ इंडियातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे, शासनाच्या व्यावसायिक शिक्षण व प्रशिक्षण विभागाने आयटीआय परीक्षेत नकारात्मक गुणाची पध्दती समाविष्ट केला आहे. २0१२-१३ पासून सहामाही परीक्षा पध्दत लागू करण्यात आली आहे. यावर्षीपासून नकारात्मक गुण पध्दती लागू केल्याने त्याचा फटका राज्यभर बसला आहे. नकारात्मक गुण पध्दती खरे तर स्पर्धा परीक्षेसाठी लागू आहे; परंतु अशा परीक्षांना का लागू केली आहे, हे अद्याप लक्षात आलेले नाही. वास्तविक, आयटीआय शिक्षणाकडे वळणारा विद्यार्थी सामान्य कुटुंबातला असतो. नकारात्मक गुण पध्दती रद्द करण्यात यावी, नापास विद्यार्थ्यांना तत्काळ निर्णय घेऊन न्याय द्यावा, आयटीआय विद्यार्थ्यांची प्रश्नपत्रिका इंग्रजीतून न घेता मराठीतून घ्यावी. याबाबत निर्णय न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेचे राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)