पथदिव्यांची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:34 IST2021-02-15T04:34:26+5:302021-02-15T04:34:26+5:30
वृक्षारोपण गरजेचे (फोटो : १४इन्फो०२) कुसूर : कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम चांगल्या दर्जाचे झाले आहे. या मार्गावर दुभाजकही आहेत. ...

पथदिव्यांची गरज
वृक्षारोपण गरजेचे (फोटो : १४इन्फो०२)
कुसूर : कऱ्हाड-ढेबेवाडी मार्गाच्या रुंदीकरणाचे काम चांगल्या दर्जाचे झाले आहे. या मार्गावर दुभाजकही आहेत. दुभाजकात यापूर्वी वृक्षारोपण करण्यात आले होते. मात्र, सध्या सर्व रोपे गायब झाली असून, दुभाजक भकास बनले आहे. त्यामुळे शोभेच्या झाडांचे रोपण करणे गरजेचे आहे.
दुहेरी वाहतूक
कऱ्हाड : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गाच्या उपमार्गावर मलकापूरपर्यंत एकेरी वाहतूक आहे. मात्र, प्रत्यक्षात या मार्गावरून दुहेरी वाहतूक होताना दिसते. वाहने उलट्या दिशेने येत असल्यामुळे अनेक वेळा कोंडीची समस्या निर्माण होत आहे. वाहतूक पोलिसांनीही याकडे दुर्लक्ष केले असून, नियमाचे उल्लंघन करणारांवर दंडात्मक कारवाई करणे गरजेचे आहे.
झाडांचा धोका
कऱ्हाड : सुपने-किरपेदरम्यानच्या रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात झाडेझुडुपे वाढली आहेत. वाढलेल्या झाडांमुळे वळणावर समोरून आलेले वाहन दिसत नाही. परिणामी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. रस्ता चांगला असल्याने या रस्त्यावरून वाहने सुसाट जातात. त्यातच पुढचे वाहन न दिसल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.