दर्जेदार क्रीडांगणे होण्याची गरज : मेहता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:25 IST2021-09-02T05:25:04+5:302021-09-02T05:25:04+5:30
फलटण : ‘दर्जेदार क्रीडांगणे, आवश्यक भौतिक सुविधा, उत्तम प्रशिक्षक आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ खेळाडूच राज्य व राष्ट्रीयस्तरावर पोहोचू ...

दर्जेदार क्रीडांगणे होण्याची गरज : मेहता
फलटण : ‘दर्जेदार क्रीडांगणे, आवश्यक भौतिक सुविधा, उत्तम प्रशिक्षक आणि शारीरिक व मानसिकदृष्ट्या सुदृढ खेळाडूच राज्य व राष्ट्रीयस्तरावर पोहोचू शकतात. या संकल्पनेला बगल देत आतापर्यंत उपलब्ध साधने, सुविधांमध्ये येथील खेळाडूंनी मोठी मजल मारली. वाढत्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आता दर्जेदार क्रीडांगणे, भौतिक सुविधा व उत्तम प्रशिक्षक आवश्यक आहे,’ असे मत ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी व्यक्त केले.
क्रीडा व युवक सेवा संचलनालय पुणे, जिल्हा क्रीडाधिकारी सातारा, तालुका क्रीडाधिकारी कार्यालय फलटण, मुधोजी हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय फलटण यांच्या संयुक्त सहभागाने घडसोली मैदान, फलटण येथे आयोजित मेजर ध्यानचंद यांची जयंती, राष्ट्रीय क्रीडा दिन आणि सुदृढ भारत अभियान अशा संयुक्त कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ हॉकी प्रशिक्षक जगन्नाथ धुमाळ होते. यावेळी मुधोजी हायस्कूलचे प्राचार्य बाबासाहेब गंगावणे, राष्ट्रीय खेळाडू दादासाहेब चोरमले, सुभाषराव भांबुरे, ज्येष्ठ राष्ट्रीय हॉकी खेळाडू शिरीष वेलणकर, महेंद्र जाधव, प्रवीण गाडे, पंकज पवार, सचिन लाळगे, सुनील वाघमारे, अक्रम मेटकरी उपस्थित होते.
माधुरी धुमाळ, माधुरी शेंडे, मानसी दोशी, वंदना माने, योगीता शहा, लीना खटावकर, परिमल रणवरे, अश्विनी चिरमे, सीमा जगदाळे, जयश्री शेंडे यांचा सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.