फलकांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:36 IST2021-02-12T04:36:34+5:302021-02-12T04:36:34+5:30

पाकीटमारांवर लक्ष सातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानकात यापूर्वी खिसेकापू, पाकीटमार, महिलांचे दागिने चोरणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या ...

The need for panels | फलकांची गरज

फलकांची गरज

पाकीटमारांवर लक्ष

सातारा : सातारा मध्यवर्ती बसस्थानकात यापूर्वी खिसेकापू, पाकीटमार, महिलांचे दागिने चोरणाऱ्यांचे प्रमाण वाढले होते. यावर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने पोलीस लक्ष ठेवून आहेत. काही अनुचित प्रकार घडताना आढळल्यास, संशयास्पद हालचाली जाणवल्यास संशयितांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

रेंजअभावी गैरसोय

सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा बंद आहेत. मुलांना ऑनलाईन पद्धतीने शिकवले जात आहे. मात्र जावळी, सातारा, पाटण तालुक्यांतील दुर्गम भागातील अनेक गावांमध्ये मोबाईल इंटरनेटची रेंजच मिळत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

सीसीटीव्ही कॅमेरे गायब

सातारा : साताऱ्यातील अनेक रस्त्यांवर काही वर्षांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यामुळे गुन्हेगारीचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, अलीकडे अनेक ठिकाणचे कॅमेरे खराब झाले आहेत, तर काही ठिकाणी काढून टाकले आहेत. त्यामुळे सीसीटीव्ही कॅमेरे बदलण्याची मागणी केली जात आहे.

मास्क वापरण्याबाबत निष्काळजीपणा

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला आहे. त्यामुळे कोरोनाबाबतची नागरिकांमधील भीती कमी झाल्याचे जाणवत आहे. साताऱ्यातील आठवडा बाजारात अनेक व्यापारी, शेतकरी त्याचप्रमाणे ग्राहकही मास्क न लावताच व्यवहार करत आहेत. अनेकांचा मास्क केवळ हनुवटीला लावलेला असतो.

प्रेमीयुगुलांचा वावर

मेढा : जावळी तालुक्यातील काही डोंगरात प्रेमीयुगुले येऊन बसत असतात. त्यामुळे परिसरातील नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. अशा प्रेमीयुगुलांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील नागरिकांमधून वारंवार करण्यात येत आहे.

फूलझाडे वाळली

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या दुभाजकात मोठ्या प्रमाणावर फूलझाडे लावण्यात आली आहेत. मात्र काही दिवसांपासून त्यांना पाणी देण्यात आलेले नाही. त्यामुळे रस्ता दुभाजकातील फूलझाडे वाळून चालली आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

स्वच्छतागृहाचा अभाव

सातारा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कित्येक किलोमीटर अंतरात सार्वजनिक स्वच्छतागृह नाहीत. त्यामुळे खासगी वाहनांतील प्रवाशांची गैरसोय होत असते. यासाठी खासगी ढाबे किंवा महामार्गाकडेच्या पेट्रोलपंपावरील स्वच्छतागृहाचा आधार घ्यावा लागत आहे.

सांडपाणी रस्त्यावर

खटाव : खटाव तालुक्यातील ग्रामीण भागातील अनेक गावांत योग्य ती सुविधा राखली जात नसल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत संबंधित ग्रामपंचायतींनी काळजी घेण्याची गरज आहे.

पाण्याचा अपव्यय

सातारा : शहराच्या अनेक भागात पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे. मात्र, त्याची सातारकरांना किंमत नसल्यासारखे झाले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जात आहे. पालिकेकडून उन्हाळ्यात पाण्याची कपात केली जाते. त्यामुळे नागरिकांनीही पाण्याची बचत करण्याची गरज आहे.

हॉर्नवर बंदीची मागणी

सातारा : येथील जिल्हा परिषद व दवाखाना, कोविड जम्बो हॉस्पिटल असलेल्या परिसरात दुचाकी-चारचाकी वाहनधारकांकडून वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजवले जात आहेत. याचा नागरिकांना त्रास होत असून, वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

विक्रेत्यांमध्ये वाढ

सातारा : येथील बाजारपेठ मार्ग तसेच अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात फिरस्त्या विक्रेत्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. कोरोना काळात घराबाहेर न पडणाऱ्या ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी विक्रेते हातगाडे घेऊन बाजारपेठेसह रहिवासी भागातही फिरत आहेत.

ध्वनीप्रदूषणात वाढ

सातारा : येथील महाविद्यालय परिसरात तसेच शासकीय रुग्णालय परिसरात दुचाकी-चारचाकी वाहनधारकांडून वाहनांचे कर्णकर्कश हॉर्न वाजवले जात आहेत. याचा नागरिकांना त्रास होत असून, वाहतूक पोलिसांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: The need for panels