‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरेंवर खुनी हल्ला
By Admin | Updated: December 2, 2014 23:30 IST2014-12-02T23:15:31+5:302014-12-02T23:30:19+5:30
कऱ्हाडातील घटना : २0 जणांवर गुन्हा

‘एनएसयूआय’चे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरेंवर खुनी हल्ला
कऱ्हाड : पूर्वी झालेल्या वादावादीच्या कारणावरून नॅशनल स्टूÞडंट्स युनियन आॅफ इंडियाचे (एनएसयूआय) प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास पंधरा ते वीसजणांनी खुनी हल्ला केला. तलवार, हॉकी स्टिक व गजाने झालेल्या मारहाणीत मोरे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सह्याद्री रूग्णालयात उपचार सुरू आहेत. येथील छत्रपती शिवाजी स्टेडियमवर ही घटना घडली.
याबाबत शिवराज मोरे यांनी कऱ्हाड शहर पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनुसार मोहित काटवटे, अरूण मुळे, किरण काटवटे, श्रीकांत काटवटे, मिलिंंद मुळे, शंकर नलवडे (सर्व रा. भोई गल्ली, कऱ्हाड) यांच्यासह २० जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी अरूण मुळे याला शहर पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवराज मोरे सोमवारी सायंकाळी मित्रांसमवेत शिवाजी स्टेडियम येथे व्यायामासाठी गेले होते. रात्री साडेआठच्या सुमारास ते व्यायाम करीत असताना अचानक पंधरा ते वीसजणांनी दगडफेक सुरू केली. त्यानंतर त्यांना हॉकी स्टिक, लाकडी दांडके, तलवार व फायटरच्या साह्याने मारहाण करण्यात आली. ओंकार पाटील याच्याबरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून भोई गल्ली येथील युवकांनी आपल्यालाङ्कमारहाण केली असल्याचे शिवराज मोरे यांनी म्हटले आहे. मारहाणीत मोरे यांचा मोबाईल व पाच तोळे सोन्याची चेन असा सुमारे १ लाख ८० हजारांचा ऐवज गायब झाला आहे. अटक केलेल्या अरूण मुळे याला न्यायालयात हजर केले असता त्याला दि. ८ पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)