जिल्ह्यात पालिकांमध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा !

By Admin | Updated: July 15, 2014 01:24 IST2014-07-15T01:23:15+5:302014-07-15T01:24:25+5:30

जोरदार चुरस : नगराध्यक्ष-उपनगराध्यक्ष निवड

NCP's upper caste in the district! | जिल्ह्यात पालिकांमध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा !

जिल्ह्यात पालिकांमध्ये राष्ट्रवादीचा वरचष्मा !

सातारा : जिल्ह्यातील आठ नगरपालिकांच्या नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष निवडी अधिकृतरीत्या आज, सोमवारी जाहीर करण्यात आल्या. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडींना महत्त्व प्राप्त झाले होते. या निवडीत बहुतांश ठिकाणी राष्ट्रवादीने आपला वरचष्मा कायम ठेवला आहे.
साताऱ्यात नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पदाची निवड अपेक्षेप्रमाणे बिनविरोध झाली. नगराध्यक्षपदी नगरविकास आघाडीचे सचिन सारस, तर उपनगराध्यक्षपदी दिनाज शेख यांची बिनविरोध निवड झाली आहे.
कऱ्हाडच्या नगराध्यक्षपदी अ‍ॅड. विद्याराणी साळुंखे यांची औपचारिक घोषणा झाली, तर उपनगराध्यक्षपदी राजेंद्र यादव यांची दुसऱ्यांदा निवड झाली़ महाबळेश्वरच्या नगराध्यक्षपदी उज्ज्वला तोष्णीवाल यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले असून, उपनगराध्यक्षपदी संतोष आखाडे यांची निवड झाली. म्हसवडच्या नगराध्यक्षपदी विजय सिन्हा व उपनगराध्यक्षपदी डॉ. वसंत मासाळ यांची बिनविरोध निवड झाली. रहिमतपूरच्या नगराध्यक्षपदी उज्ज्वला अविनाश माने यांची, तर उपनगराध्यक्षपदी संभाजीराव माने-पाटील यांची बिनविरोध निवड झाली.
फलटणच्या नगराध्यक्षपदी सारिका जाधव यांची, तर उपनगराध्यक्षपदी पांडुरंग गुंजवटे यांची निवड झाली. (प्रतिनिधी)
 

Web Title: NCP's upper caste in the district!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.