घाडगेवाडी, कापशी, मुळीकवाडीत राष्ट्रवादीची सत्ता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:19 IST2021-01-24T04:19:02+5:302021-01-24T04:19:02+5:30
मुळीकवाडी येथे सात जागा असून ती राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर पॅनेल विरुध्द राष्ट्रवादी (राजे गट) लढत ...

घाडगेवाडी, कापशी, मुळीकवाडीत राष्ट्रवादीची सत्ता
मुळीकवाडी येथे सात जागा असून ती राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकर पॅनेल विरुध्द राष्ट्रवादी (राजे गट) लढत होऊन पाच जागा राष्ट्रवादीने जिंकल्या एक जागा खासदार रणजितसिंह निंबाळकर गटाने जिंकली तर एक जागा बिनविरोध झाली. आनंदगाव ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या (राजे गट) ताब्यात होती. यावेळी राजे गट पॅनेल व खासदार रणजितसिंह निंबाळकर पॅनेल अशी लढत होऊन खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर पॅनेलने चार जागा जिंकल्या तर एक राष्ट्रवादीला मिळाली तर दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. घाडगेवाडी येथे राजे गटात लढत होऊन युवा परिवर्तन पॅनेलने चार जागा जिंकल्या तर दुसऱ्या पॅनेलला तीन जागा मिळाल्या आहेत.
चौकट
आळजापुरात राजेगट
आळजापूर ग्रामपंचायत निवडणूक राष्ट्रवादी राजे गट विरुध्द राष्ट्रवादी झाली. यात राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विलासराव नलवडे, शिवशक्ती उद्योग समुहाचे अध्यक्ष शंकरराव नलवडे, तालुका दूध संघाचे संचालक तुकाराम नलवडे यांच्या नेतृत्वाखालील रामराजे नाईक-निंबाळकर गाव विकास पॅनेलने नऊ पैकी नऊ जागा जिंकून यश मिळविले. यामध्ये शुभम नलवडे, दिलीप नलवडे, सुनील पवार, सचिन मसुगडे, राजकुंवर नलवडे, गितांजली नलवडे, छाया नलवडे, पुष्पा पवार, उज्ज्वला भंडलकर हे विजयी झाले. विजयी उमेदवार गावात येताच कार्यकर्ते यांनी जल्लोष करीत जेसीबीतून गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.