सातारा : प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेच्या पदाधिकारीपदी सभासद परिवर्तन पॅनलच्या संचालकांना संधी मिळाली असून चेअरमनपदी नवनाथ जाधव यांना संधी मिळाली आहे. तसेच व्हाईस चेअरमनपदी शशिकांत सोनवलकर यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी शंकर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बँकेच्या नवनिर्वाचित संचालकांच्या बैठकीत या निवडी करण्यात आल्या.गेल्या महिन्यात झालेल्या बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सभासद परिवर्तन पॅनलने २१ पैकी १७ जागा जिंकल्या होत्या. तर निवडीनंतर मायणी गटातून निवडून आलेले शहाजी खाडे हे सुद्धा सभासद परिवर्तन पॅनलमध्ये सहभागी झाले. त्यामुळे सभासद परिवर्तन पॅनलची बाजू आणखी भक्कम झाली.चेअरमनपदासाठी पॅनलच्या वतीने वडूज गटातील संचालक नवनाथ सदाशिव जाधव, तर व्हाईस चेअरमन पदासाठी फलटण गटातून निवडून आलेले संचालक शशिकांत सोनवलकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. तर विरोधकांतर्फे चेअरमन, व्हाईस चेअरमनपदासाठी अनुक्रमे महेंद्र जानुगडे व विजय शेळके यांनी अर्ज दाखल केले होते.
सातारा शिक्षक बँकेच्या चेअरमनपदी वडूजचे नवनाथ जाधव
By दीपक देशमुख | Updated: December 6, 2022 16:49 IST