नटराज युवक मंडळाचे कार्य कौतुकास्पद : शिवेंद्रसिंहराजे भोसले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2021 04:30 IST2021-02-19T04:30:19+5:302021-02-19T04:30:19+5:30

कुडाळ : ‘कोरोना काळात सामाजिक भावना जपत नटराज युवक मंडळाने आरोग्य सुविधा उभारण्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. गणेश जयंतीनिमित्ताने ...

Natraj Yuvak Mandal's work is commendable: Shivendra Singh Raje Bhosale | नटराज युवक मंडळाचे कार्य कौतुकास्पद : शिवेंद्रसिंहराजे भोसले

नटराज युवक मंडळाचे कार्य कौतुकास्पद : शिवेंद्रसिंहराजे भोसले

कुडाळ : ‘कोरोना काळात सामाजिक भावना जपत नटराज युवक मंडळाने आरोग्य सुविधा उभारण्यासाठी मोलाची कामगिरी केली आहे. गणेश जयंतीनिमित्ताने सांस्कृतिक कार्यक्रमांना बगल देऊन यांनी कोरोना योद्ध्‌यांचा सन्मान केला असून, मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे,’ असे मत सातारा-जावळीचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले.

नटराज युवक मंडळ कुडाळच्यावतीने गणेश जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उपसभाती सौरभ शिंदे, बाजार समितीचे सभापती राजेंद्र शिंदे, प्रतापगड कारखान्याचे संचालक मालोजीराव शिंदे, सरपंच सुरेखा कुंभार, उपसरपंच सोमनाथ कदम, माजी सरपंच जितेंद्र शिंदे, सामाजिक कार्यकर्ते हेमंत शिंदे, धैर्यशील शिंदे, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.

यावर्षी कोरोनाच्या प्रभावामुळे मंडळाच्यावतीने अतिशय साधेपणाने गणेश जयंती साजरी करण्यात आली. कोरोनाकाळात कुडाळ भागात उल्लेखनीय काम केल्याबद्दल येथील डॉ. प्रमोद जंगम यांना याप्रसंगी सन्मानित केले. तसेच कुडाळ ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कारही करण्यात आला.

Web Title: Natraj Yuvak Mandal's work is commendable: Shivendra Singh Raje Bhosale