शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी सोडलेली नाही; आजही मी पक्षातच - आमदार मकरंद पाटील 

By दीपक शिंदे | Updated: August 5, 2023 12:51 IST

शरद पवार जितके महत्त्वाचे तितकेच अजितदादा ही

वाई : ‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडलेला नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार हे आमचे दैवत आहेत, तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे सक्षम नेतृत्व आहे. त्यामुळे आजही मी राष्ट्रवादी पक्षातच आहे,’ अशी भूमिका आमदार मकरंद पाटील यांनी येथे व्यक्त केली. वाई येथील प्राथमिक शिक्षक विठ्ठल माने यांच्या निवृत्ती कार्यक्रमात त्यांनी प्रथमच कार्यकर्त्यांसमोर आपली भूमिका स्पष्ट केली.आमदार पाटील म्हणाले, ‘मी राष्ट्रवादी काँग्रेस सोडली नाही व सोडणारही नाही. शरद पवार हे आमचे दैवत आहेत. त्यांना कधीही विसरू शकत नाही. २००९ पासून मतदारसंघात झालेला विकास तुम्हाला वाटत असेल तर तो फक्त अजित पवार यांच्यामुळे हे आपल्याला मान्य करावे लागेल. अन्य कोणामुळे नाही. त्यामुळे शरद पवार जितके महत्त्वाचे तितकेच अजितदादा ही महत्त्वाचे आहेत.आर्थिक अडचणीतील किसन वीर कारखान्याची जबाबदारी घेण्यास तयार नव्हतो. त्यावेळी तुम्ही कार्यकर्त्यांनीच निवडणूक लढवून कारखाना ताब्यात घेण्याची मागणी वारंवार केली होती. कारखाना वाचला पाहिजे, शेतकऱ्यांचे अश्रू पुसले पाहिजेत. असे तुम्ही म्हणत होतात. मागील वर्षी कारखाना ताब्यात आल्यानंतर सभासदांनी दिलेल्या भांडवलावर कारखाना सुरू केला. त्यानंतर वर्षभरात आपल्याला कोणत्याही बँकेने मदत केलेली नाही, हे लक्षात घेतले पाहिजे. आता कारखाना सुरळीत चालवण्यासाठी अजित पवार यांचे मार्गदर्शन व मदतीची गरज लागणार आहे.मकरंद पाटील म्हणाले, खंडाळा तालुक्यात ट्रामा सेंटर, महाबळेश्वर तालुक्यात अनेक छोट्या - मोठ्या कामांना निधी उपलब्ध झाला आहे. २००९ मध्ये माढा मतदारसंघातून शरद पवार यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांचे मूळ गाव नांदवळ येथे सभा होती. या सभेमध्ये सूत्रसंचालन केल्यामुळे शासकीय सेवेत असलेल्या विठ्ठल माने यांना आचारसंहितेचा भंग केल्यामुळे निलंबित केले होते. मात्र, अजित पवार यांनी केलेल्या प्रयत्नांमुळेच विठ्ठल माने यांना पुन्हा सेवेमध्ये संधी मिळाली, याची आठवण मकरंद पाटील यांनी करून दिली.यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेश चिटणीस प्रताप पवार, तालुका सूतगिरणीचे अध्यक्ष शशिकांत पिसाळ, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा अरुणादेवी पिसाळ, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब सोळसकर, किसन वीर खंडाळा तालुका सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व्ही. जी. पवार, राजेंद्र तांबे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरNCPराष्ट्रवादी काँग्रेसMakarand Patilमकरंद पाटीलSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार